माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर माइक टायसन हा मिक्स मार्शल आर्ट्सच्या (एमएमए) कुमिटे-1 लीग या स्पर्धेचा मार्गदर्शक असणार आहे. या लीगमध्ये भारतीय मुष्ठीयोध्द्यांचा पण यात समावेश असणार आहे. या स्पर्धेची सुरवात 29 सप्टेंबरला मुंबई येथे होणार आहे.
या स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि युनायटेड अरब अमिराती यांच्यात होणार असून या सामन्याला टायसन उपस्थित असणार आहे.
या लीगचे प्रक्षेपण सोनी इसपीएनवर होणार आहे. मुंबईतील एनएसआयसी डोम येथे हे सामने खेळवले जाणार आहेत.
टायसन हे हेवीवेटचे विजेतेपद जिंकणारे सर्वात कमी वयाचे बॉक्सर होते. त्यावेळी त्यांचे वय 20 वर्षे, चार महिने आणि 22 दिवस असे होते.
“या स्पर्धेसाठी टायसन हे मुंबईत येऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवणार आहेत. याच वेळी तो कुमिते-2 लीगचे अधिकृत अनावरण करून पहिल्या लढतला सुरूवात करणार आहे. यामध्ये जगभरातून 25 मुष्ठीयोध्दे सहभागी होणार आहेत”, असे या स्पर्धेचे आयोजक मोहमद बुधानी यांनी सांगितले.
Mike Tyson Fighters Promo: https://t.co/Tn7UtpHTcQ via @YouTube
— Kumite 1 League (@kumite1league) September 6, 2018
तसेच यामध्ये विविध देशांचे मिळून आठ संघ असणार असून या लीगचे हे प्रथमच वर्ष आहे. प्रत्येक संघाच्या एकूण नऊ लढती होणार तसेच यामध्ये महिलांचे सामनेही होणार आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही
–असा पराक्रम करणारा केएल राहुल बनला अजिंक्य रहाणे नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू
–श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय