बऱ्याच दिवसांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडू विचित्र पद्धतीने रन आऊट होताना आज पाहायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात डेविड मिलर बुमराहकरवी एका विचित्र पद्धतीने रन आऊट झाला.
३०व्या षटकाटाच्या पहिल्याच चेंडूवर हा धावबाद पाहायला मिळाला. २९व्या षटकात डिव्हिलिअर्स बाद झाल्यामुळे त्याच्या जागी खेळायला आलेल्या मिलरला जेमतेम ३ चेंडू खेळायला मिळाले. अश्विनच्या ३०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फाफ डुप्लेसीने थर्डमॅनला उभा असणाऱ्या बुमराहकडे फटका खेळला. त्यानंतर त्याने एक चोरटी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु पुन्हा नाही म्हणत तो पाठीमागे परतला. परंतु त्याचवेळी नॉन स्ट्राइककडून धावत येणार मिलर स्ट्राइकच्या बाजूला पोहचला होता. बुमराहने चलाखी दाखवत चेंडू कर्णधार कोहलीकडे दिला. क्षणाचाही विलंब न लावता कोहलीने चेंडूने नॉन स्ट्रायकर बाजूच्या यष्टी खाली पाडल्या होत्या.
दुसऱ्या बाजूने मिलर आणि डुप्लेसी दोघेही एकाचवेळी स्ट्रायकर बाजूला पोहोचलेलं दिसत होते. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि त्यात मिलर आऊट झाल्याचे स्पष्ट दिसले.
आफ्रिकेला ज्यावेळी मिलरची मोठ्या प्रमाणावर गरज होती त्याच वेळी ही महत्त्वाची विकेट गेली. डुप्लेसीसुद्धा पुढे काही विशेष करू शकला नाही आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर ३६ धावांवर बाद झाला.
#INDvSA: Lack of conversations between #FafDuPlessis n #DavidMiller. What a match!Definitely win! #SouthAfrica -157/5 (33.4 over) #BleedBlue pic.twitter.com/prVBedEgzE
— Harsh Pancholi (@harshpancholi21) June 11, 2017