एमएस धोनी, रांचीच्या या पुत्राने तब्बल १६ वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. एक खेळाडुनंतर एक कर्णधार म्हणुन त्याने भारतीय संघाला अनेक सामने तसेच अनेक मालिंकामध्ये विजय मिळवून दिले आहेत.
मागील काही काळापासुन धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु होती. तसेच २०१९ विश्वचषकानंतर त्याने एकाही सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. काहींना वाटत होते की त्याने निवृत्ती घ्यायला हवी तर काही जणांना वाटत होते की अजून त्याच्यात क्रिकेट बाकी आहे. शेवटी १५ ऑगस्टला सं.७.२९ ला त्याने सर्व चर्चांना पूर्णविराम देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्तीची घोषणा केली.
रेल्वे मंत्रालयाचा धोनीला सलाम
सर्वांनाच माहित आहे की क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी धोनी खडकपुर रेल्वे स्टेशनवर टीसीच्या पदावर नोकरीस होता. नोकरी सोडल्यानंतर धोनीने जागतिक क्रिकेट मध्ये आपले नाव झळकावले.
आता याच रेल्वे मंत्रालयाने आपल्या माजी कर्मचाऱ्यासाठी खास ट्विट केला आहे. धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्वीट केलं आहे. यात त्यांनी लिहीले आहे की, ” त्या माणसाचे अभिनंदन ज्याने भारतीय रेल्वेकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली व शेवट भारताला एक अभिमान वाटावा अशी कामगिरी करुन केला. आम्ही तुला एक जबरदस्त कामगिरी करणारा व्यक्ती म्हणून नक्की मीस करु.”
Cheers to the man who started his career with Indian Railways and ended with making India proud. We will miss you as a great performer.@msdhoni#MSDhoni#MSDhoni7 pic.twitter.com/qV5QpUa7og
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 16, 2020
धोनीने रेल्वेत जेव्हा काम केले आहे, ते एमएस धोनी, अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.