पुणे: भारती विद्यापीठ, पुणे आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉस्केटबॉल स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी इस्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या महिला बॉस्केटबॉल संघाने भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाचा २६-२१ असा पराभव करत सुवर्ण पदक व स्पर्धेचे सर्वसाधारण जेते पदावर आपले नाव कोरले. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, एमआयटी इस्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. अनंत चक्रदेव यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
भारती विद्यापीठ पुणे यांनी नुकत्याच आंतर महाविद्यालयीन बॉस्केटबॉल स्पर्धा भरविल्या होत्या. या स्पर्धेत १२ विविध महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत एमआयटी इस्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या महिला बॉस्केटबॉल संघाने एकूण चार ही सामने जिंकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. पहिल्या सामन्यात डीईएस लॉ कॉलेज संघाचा २८-२४, दुसऱ्या सामन्यात सिम्बायोसिस लॉ स्कूल या संघाचा २५-१६ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे संघासोबत झाला. या सामन्यात एमआयटी इस्टिट्यूट ऑफ डिझाईन संघाने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा २४-१९ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना एमआयटी इस्टिट्यूट ऑफ डिझाईन व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघात झाला. हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मध्यांतरापर्यंत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाने बढत घेतली होती. मध्यांतरानंतर एमआयटी इस्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या हरमिता चुंडावत हिने केलेल्या गोलच्या जोरवर एमआयटी संघाने बढत घेतली. शेवटी हा सामना २४-१९ अशा फरकाने जिंकत एमआयटी संघाने सुवर्ण पदक व सर्व साधारण जेतेपदावर आपले नाव कोरले. सर्वात्कृष्ठ खेळाडू म्हणून इस्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या हरमिता चुंडावत हिला गौरविण्यात आले.