अाॅस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज मिचेल जाॅन्सनला जिममधील व्यायाम चांगलाच महागात पडला आहे. chin-up bar व्यायाम करताना डोक्याला लागल्यामूळे त्याला तब्बल १६ टाके पडले आहेत.
या ३६ वर्षीय दिग्गजाने याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अतिशय खोलवर झालेल्या जखमेचे त्याने हे फोटो शेअर केले आहेत.
हा संपुर्ण प्रकार घडला तेव्हा त्याला लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
“तुम्हाला जर जखमा अाणि रक्त सांडलेलं आवडत नसेल तर हे फोटो पाहू नका. माझ्याबरोबर झालेली ही अतिशय वाईट गोष्ट आहे. परंतू मी आता ठीक आहे. ” असे त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
मिचेल जाॅन्सन अाॅस्ट्रेलियाकडून ७३ कसोटी, १५३ वनडेत आणि ३० टी२० सामने खेळला आहे. २०१५मध्ये त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.
https://twitter.com/MitchJohnson398/status/973062265133027328
https://www.instagram.com/p/BgNfVtkj0Lk/?taken-by=mitchjohnson398