---Advertisement---

गहुंजेवर मार्श बरसला! बांगलादेशी गोलंदाजांना झोडत ठोकले विश्वचषकातील दुसरे शतक

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (11 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश असा सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 306 धावा उभ्या गेल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्श याने मजबूत स्थितीत आणले. त्याने विश्वचषकातील आपले दुसरे शतक यावेळी पूर्ण केले.

यापूर्वीच उपांत्य फेरीत जागा मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया समोर स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश ने 307 धावांचे मोठे आव्हान उभे केले. वॉर्नर व हेड यांनी अर्धशतकी सलामी देत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. हेडबाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या मार्श याने आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमण करत आधी अर्धशतक पूर्ण केले.

दुसऱ्या बाजूने वर्णन अर्धशतकानंतर बाद झाल्यावरही त्याने आपला हाच खेळ कायम राखला. त्याने 87 चेंडूंमध्ये आपले विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण केले. यामध्ये अकरा चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. त्याने यापूर्वी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध देखील शतक ठोकले होते.

(Mitchell Marsh Hits Century Against Bangaladesh 2nd In 2023 ODI World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---