दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 30 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तसेच 7 सप्टेंबरपासून उभय संघांमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होईल. मात्र , त्याआधीच अनुभवी स्टीव्ह स्मिथ व मिचेल स्टार्क यांनी या दौऱ्यातून माघार घेतली आहे.
टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज असलेल्या स्मिथ याने मनगटाच्या दुखापतीमुळे या संपूर्ण दौऱ्यातून माघार घेतली. तो कमीत कमी एक महिना क्रिकेट खेळू शकणार नाही. तर दुसरीकडे स्टार्क याने ग्रोईन इंजुरीचे कारण देत या दौऱ्यातून नाव मागे घेतले. स्मिथ याने माघार घेतल्यामुळे आता वनडे व टी20 अशा दोन्ही मालिकांमध्ये अष्टपैलू मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना दिसेल. वनडे संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याने यापूर्वीच या दौऱ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.
स्मिथ याच्या जागी वनडे संघात मार्नस लॅब्युशेन याची निवड करण्यात आली आहे. त्याने या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यास विश्वचषकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. तर, टी20 संघात ऍश्टन टर्नर त्याची जागा घेईल. वनडे संघात मिचेल स्टार्क याच्या ऐवजी स्पेन्सर जॉन्सन याला संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया टी20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ऍरोन हार्डी, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ऍश्टन टर्नर, ऍडम झम्पा.
ऑस्ट्रेलिया वनडे संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा
(Mitchell Starc And Steve Smith Ruled Out From South Africa Tour)
महत्वाच्या बातम्या-
गंभीर सोडणार सुपरजायंट्सची साथ? ‘या’ संघाकडून आली ऑफर
मिनी ऑरेंज आयटीएफ मिश्र रिले राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक