आगामी वनडे विश्वचषकासाठी सराव सामन्यांची सुरुवात झाली आहे. सराव सामनांच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्या दरम्यान तिरुअनंतपुरम येथे सामना खेळला गेला. पावसामुळे प्रत्येकी 23 षटकांच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 166 धावा केल्या. त्यानंतर मिचेल स्टार्क याने हॅट्रिक घेत शानदार सुरुवात केली.
पावसामुळे षटके कमी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ याचे अर्धशतक व इतर फलंदाजांच्या योगदानामुळे 167 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड संघाची सुरुवात खराब झाली.
मागील दोन विश्वचषक गाजवलेल्या मिचेल स्टार्क याने पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर मॅक्स ओडए याला पायचित केले. तर अखेरच्या चेंडूवर अनुभवी वेस्ली बारेसी याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बास डी लिडे याला देखील त्रिफळाचित करत त्याने आपली हॅट्रिक पूर्ण केली.
(Mitchell Starc Complete Hatrick Against Netherlands In ODI World Cup Warm Up Games)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी युवीची अश्विनला नापसंती! ‘या’ अष्टपैलूच्या पारड्यात टाकले वजन
डेल स्टेनची भविष्यवाणी! विश्वचषकात धमका करतील ‘हे’ पाच गोलंदाज, दिग्गजांनाच नाही दिले स्थान






