ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला यावर्षी आयपीएल २०२०मध्ये न खेळण्याचे काही दु:ख नाही. तो म्हणाला की, तो येत्या उन्हाळी हंगामाची तयारी करण्यात व्यस्त आहे. स्टार्कने या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकावर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली होती. परंतु कोविड-१९ व्हायरसमुळे टी२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली.
आयपीएलमध्ये २०१४ आणि २०१५ अशी २ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळणाऱ्या ३० वर्षीय स्टार्कने दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने म्हटले, “मला माहीत आहे की दूरदृष्टी ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि आता आयपीएल वेगळ्या वेळी होत आहे, मी माझा निर्णय बदलणार नाही.”
तो पुढे म्हणाला, “खेळाडू जेव्हा सप्टेंबरमध्ये आयपीएल स्पर्धेत खेळत असतील, तेव्हा मला सरावामध्ये वेळ घालवून आनंद होईल. मी उन्हाळ्यासाठी तयार होत आहे.”
“पुढील वर्षी आयपीएल झाले आणि मला खेळण्याची इच्छा झाली किंवा माझ्या आसपासच्या लोकांना मी खेळावे असे वाटले, तर मी निश्चित यावर विचार करेल. परंतु यावर्षी घेतलेल्या निर्णयावर मी ठाम आहे.
स्टार्कला २०१८ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात सामील केले होते. परंतु तो दुखापतीमुळे हंगामातून बाहेर पडला होता. आणि शेवटी नोव्हेंबरमध्ये त्याला मुक्त करण्यात आले. हा वेगवान गोलंदाज सध्या न्यू साऊथ वेल्स संघाच्या आपल्या संघसहकाऱ्यांसोबत सराव करत आहे. त्याचबरोबर तो ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या इंग्लंड दौऱ्याची पुष्टी होण्याची वाट पाहत आहे.
ऑस्ट्रेलियाला इंग्लंड दौऱ्यात ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत. ही मालिका ४ सप्टेंबरपासून खेळण्यात येणार आहे. परंतु हे ऑस्ट्रेलियन सरकारच्या परवानगीवर अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने
दरवर्षीप्रमाणेचं एवढे दिवस गायब झालेल्या धोनीचे सीएसकेच्या चाहत्यांना खास गिफ्ट, पहा काय आहे…
ट्रेंडिंग लेख –
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन