मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2024 च्या आधी झालेल्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आता स्पर्धेतील सर्वात महागड्या खेळाडूनं सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माला आयपीएल 2024 चा सर्वोत्तम चेंडू टाकला, जो ‘अनप्लेएबल’ होता. स्टार्कच्या या शानदार चेंडूचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
स्टार्कचा चेंडू मधल्या यष्टीच्या रेषेवर आदळतो आणि नंतर अचानक बाहेर स्विंग होऊन अभिषेकच्या स्टंपचा चुराडा करतो. हा चेंडू अभिषेकला बिलकूलच समजला नाही. हैदराबादच्या सलामीवीरानं बॅट खाली आणली, तोपर्यंत चेंडूनं स्टंप उडवला होता. स्टार्कनं सामन्याच्या पहिल्याच षटकात हा चेंडू टाकला. अभिषेक शर्मा 5 चेंडूत केवळ 2 धावा करून बाद झाला. या चेंडूचा वेग ताशी 140 किमी इतका होता.
AN ABSOLUTE RIPPER! 🤩
As spectacular as it gets from Mitchell Starc ⚡️
He gets the in-form Abhishek Sharma early 🔥
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #KKRvSRH | #Final | #TheFinalCall pic.twitter.com/K5w9WIywuR
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
यानंतर मिचेल स्टार्कनं आपल्या तिसऱ्या षटकात राहुल त्रिपाठीला बाद केलं. तो 13 चेंडूत 9 धावा करून तंबूत परतला. या सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये स्टार्कनं अत्यंत घातक गोलंदाजी केली. त्यानं 3 षटकांत केवळ 14 धावा देत 2 विकेट घेतल्या.
याआधी स्टार्कनं हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर 1 मध्ये आपल्या शानदार गोलंदाजीनं धुमाकूळ घातला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरनं 8 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात स्टार्कनं 4 षटकात 34 धावा देऊन 3 बळी घेतले होते. या चमकदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब मिळाला आला. आता फायनलमध्येही स्टार्क चमकदार कामगिरी करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या 7 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ दोन दिग्गजांशिवाय खेळला जातोय आयपीएल फायनल!
आयपीएल फायनलमध्ये भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व! आतापर्यंत इतक्या सामन्यांत जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार