---Advertisement---

मिचेल स्टार्क ऑन फायर! पहिल्याच षटकात काढली भारतीय फलंदाजाची विकेट, व्हिडिओ व्हायरल 

On: शनिवार, डिसेंबर 26, 2020 3:04 PM
---Advertisement---

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शनिवारपासून (२६ डिसेंबर) भारत-ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ १ बाद ३६ धावांवर आहे. या सामन्याच्या पहिल्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताला मोठा झटका दिला. त्याच्या अप्रतिम विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात १९५ धावांवर गारद झाला. त्यांनंतर भारताकडून पहिल्या डावात मयंक अगरवाल आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. अशात या युवा खेळाडूंपुढे पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाच्या दांडग्या गोलंदाजाचे आव्हान होते. हा गोलंदाज म्हणजे, मिचेल स्टार्क.

३० वर्षीय स्टार्कच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाजी करत असलेला अगरवाल एकही धाव घेऊ शकला नाही. त्यानंतर स्टार्कचा दुसराच चेंडू अगरवालच्या पॅडच्या इनसाइड एजवर लागला; त्यामुळे अगरवाल पहिल्यांदा बाद होण्यापासून वाचला. पण स्टार्कने षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याची विकेट काढली. त्याने शेवटी टाकलेल्या इनस्विंगर चेंडूमुळे अगरवालचा गोंधळ उडाला आणि तो चेंडू अगरवालच्या पायाला लागला. त्यामुळे खाते न उघडताच अगरवाल पव्हेलियनला परतला.

https://twitter.com/Rakesh5_/status/1342717486123208705?s=20

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी जास्त विशेष राहिली नाही. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे एकही ऑस्ट्रलियन फलंदाज ५० धावा करेपर्यंतही टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मार्नस लॅब्यूशानेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तसेच ट्रॅविस हेडने ३८ धावा आणि मॅथ्यू वेडने ३० धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाज २० धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत.

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमरहाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच फिरकीपटू आर अश्विननेही ३ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडले. एवढेच नव्हे तर, पदार्पण कसोटी सामना खेळत असलेल्या मोहम्मद सिराजने मार्नस लॅब्यूशाने आणि कॅमरॉन ग्रीनची विकेट चटकावली.

महत्त्वाच्या बातम्या- 

IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात

व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने

IND vs AUS: पदार्पणातच सिराजची हवा; लॅब्यूशानेनंतर ‘या’ ऑसी फलंदाजाला धाडलं तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---