---Advertisement---

AUS vs BAN: मिचेल स्टार्कच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड, जेम्स अँडरसन दुसऱ्या स्थानी घसरला; कसोटी सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये….

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2026 11:33 AM
---Advertisement---

पहिला सामना गमावल्याने यजमान ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरूवात जबरदस्त केली आहे. मॅके येथे हा सामना सुरू असून त्याचा आज (शनिवार, 22 ऑगस्ट) पहिलाच दिवस आहे. कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. त्याबरोबरच मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील विश्वविक्रम आपल्या नावे केला.

डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने बांगलादेशच्या पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर पाहुण्या संघाला धक्का दिला. त्याने शादमन इस्लामला कॅमेरून ग्रीनकरवी झेलबाद केले. त्यामुळे स्टार्क कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

या डावात स्टार्कने एकूण 10 षटकांत 12 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव 64 धावसंख्येवरच संपुष्टात आला.

स्टार्कने विश्वविक्रम करताना इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे. मॅके कसोटीआधी कसोटीमध्ये सामन्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमात स्टार्क आणि ऍंडरसन बरोबरीत होते. दोघांनी प्रत्येकी आठ वेळा हा पराक्रम केला होता, मात्र स्टार्कने बांगलादेशविरुद्ध पुन्हा एकदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आणि ऍंडरसनला मागे टाकले आहे. त्याने नवव्यांदा हा पराक्रम करत एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारे
मिचेल स्टार्क – 9
जेम्स ऍंडरसन – 8
रे लिंडवाल – 7
रिचर्ड हॅडली – 7
कपिल देव – 7

स्टार्कच्या प्रभावी गोलंदाजीने बांगलादेशात भुकंप!
पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या स्टार्कने त्याची धमाकेदार कामगिरी सुरूच ठेवली. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या.

स्टार्कने डावाच्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मागील सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या तंजिद हसन तमिमला शून्यावर बाद केले. त्यानंतर लगेचच कर्णधार नजमुल शांतो यालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

डावाच्या पाचव्या षटकातही स्टार्कचा थरार दिसला. त्याने मोमिनुल हकला 9 धावांवर बाद केले आणि आपली चौथी विकेट मिळवली. सातव्या षटकात त्याने लिटन दासला शून्यावर बाद करत एकाच डावात पाच विकेट्स घेण्याची पुन्हा एकदा कामगिरी केली. स्टार्कने ही कामगिरी 42 मिनिटे आणि 22 चेंडूंमध्ये केली, जी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सहाव्या क्रमांकाची सर्वात जलद ठरली आहे.

कसोटी सामन्यात सर्वात जलद 5 विकेट्स (5W) घेणारे (चेंडूच्या संख्येनुसार)
15 चेंडू – मिचेल स्टार्क विरुद्ध वेस्ट इंडीज, 2025
19 चेंडू – अर्नी तोशाक विरुद्ध भारत, 1947
19 चेंडू – स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2015
19 चेंडू – स्कॉट बोलँड विरुद्ध इंग्लंड, 2021
21 चेंडू – शेन वॉटसन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2011
22 चेंडू – मिचेल स्टार्क विरुद्ध बांगलादेश, 2026

डावाचा शेवटही स्टार्कने विकेट घेत केला. त्याने 34 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शोरिफुल इस्लामला 14 धावांवर बाद करत बांगलादेशचा पहिला डाव 64 धावसंख्येवर रोखला. ऑस्ट्रेलियाच्या बाकी गोलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली. कमिन्सने 3 तर जोश हेझलवूडने एक विकेट घेतली. (Mitchell Starc sets world record most wickets in first over of a Test match AUS vs BAN Mackay test)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---