---Advertisement---

मिचेल स्टार्कचा सुपर शो! 5 बळी घेत टी20 मध्ये 200 विकेट्सचा पराक्रम

---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबाद वर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. स्पर्धेत हैदराबाद संघाची ही सलग दुसरी हार आहे. या सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना 163 धावा केल्या होत्या, नंतर धावांचा पाठलाग करताना दिल्लीने 16 षटकात हे आव्हान पूर्ण केलं.

दिल्ली कॅपिटल्सच्या मिचेल स्टार्कने चांगली कामगिरी केली. त्याने ट्रेव्हिस हेड, ईशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी बरोबर सनरायजर्स हैदराबादच्या 5 फलंदाजांना बाद केले. या पाच विकेट्स घेतल्यानंतर टी20 मध्ये मिचेल स्टार्कने 200 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने 35 धावा देत 5 विकेट्स घेऊन दिल्लीसाठी खूप महत्त्वाची कामगिरी केली.
दिल्लीसाठी कुलदीप यादवने सुद्धा 3 विकेट्स घेतल्या. 5 विकेट्स घेऊन स्टार्क पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या नंबर वर आला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला 164 धावांचं आव्हान मिळालं होतं, धावांचा पाठलाग करताना जैक फ्रेजर मेकबर्ग आणि डुप्लेसिसने दिल्लीसाठी चांगली सुरुवात केली. मेकबर्ग आणि डुप्लेसिसने 81 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे दिल्ली संघाला सहज विजय मिळवणे शक्य झाले.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शनिवार 5 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. तसेच त्यानंतर संघासमोर आरसीबीचं आव्हान असणार आहे. हा सामना 10 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---