काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ मधील आपला शेवटचा साखळी फेरी सामना खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला हा करा अथवा मरा सामना भारतीय संघाने ३ विकेट्स राखून गमावला. या सामन्यात भारतीय संघाचा वनडे विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. या सामन्यानंतर आयसीसीने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय महिला खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी ताज्या क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारताची अनुभवी फलंदाज मिताली (Mithali Raj) २ स्थानांने झेप घेत क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ६८ धावांच्या कर्णधार खेळीमुळे तिला वनडे क्रमवारीत (ICC ODI Ranking) फायदा झाला आहे. याच सामन्यात भारताविरुद्ध ८० धावांनी मोठी खेळी करणारी दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वालवार्ड हिनेही मोठी उडी घेतली आहे. ती या शानदार खेळीनंतर क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली आहे. तिने २ स्थानांची प्रगती केली आहे.
मात्र लॉराने अव्वलस्थानी कब्जा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाची धाकड क्रिकेटपटू एलिसा हिली हिला नुकसान सहन करावे लागले आहे. ती प्रथम क्रमांकावरून ४ क्रमांकाने खाली घसरत थेट पाचव्या क्रमांकावर आली आहे. तिच्याच संघातील खेळाडू बेथ मूनी दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग एका स्थानाने पुढे जात तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. इंग्लंडची नतालिया स्किव्हर चौथ्या क्रमांकावर आहे.
🔝 Wolvaardt scales ODI batting rankings summit
↗️ Pacers make significant gains in bowling chart
💪 Brunt makes gains in all-rounders listStars of #CWC22 sizzle in the latest @MRFWorldwide ICC Women's ODI Player Rankings.
👉 https://t.co/y0nnuoLgiN pic.twitter.com/8xpX5m0inZ
— ICC (@ICC) March 29, 2022
गोलंदाजी क्रमवारीत झूलन गोस्वामीला फायदा
फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत जितके बदल झाले आहेत, तितके गोलंदाजांच्या क्रमवारीत पाहायला मिळालेले नाहीत. गोलंदाजीच्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वलस्थानी विराजमान आहे. तिने आतापर्यंत विश्वचषकात १४ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची जेस जोनासन आहे. बांगलादेशची शबनीम इस्माइल हिला क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारी भारताचा गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिला २ स्थानांचा फायदा झाला आहे. ती आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. झुलन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी फेरी सामन्यात खेळली नसतानाही तिला फायदा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणातच आयुष बदोनीने गाजवलं आयपीएलचं मैदान; धवन, वॉर्नरसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
नव्या कर्णधाराचं चहलकडून तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘रोहित भारताला टी२० विश्वचषक जिंकून देईल’