भारतीय महिला संघाची माजी क्रिकेटपटू मिताली राजने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पुष्पगुच्छही भेट दिला. जेपी नड्डा आणि मिताली यांच्या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर एका चाहत्याने ती भारतीय जनता पक्षात कधी सामील होत आहे, असे विचारले आहे. मात्र, याबाबत भाजप किंवा मिताली राज यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Thank you so much Shri @JPNadda ji, Shri @N_RamchanderRao ji, Shri @kishanreddybjp ji, Shri @tarunchughbjp ji & Shri @drlaxmanbjp ji for this wonderful interaction. Thank you @pm_saiprasad. pic.twitter.com/jVW2FovTSP
— Mithali Raj (@M_Raj03) August 27, 2022
मितालीने यावर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारी ती एकमेव खेळाडू आहे. वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने तब्बल 23 वर्षे भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केले. गेल्या महिन्यातच तिच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता मात्र, तिने थेट भाजपाच्या राष्ट्रीय अद्यक्षांची भेट घेतल्याने ती राजकारणात नवी इनिंग सुरू करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा होत आहेत. यााआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि दिग्गज सलामीवीर गौतम गिंधीर यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया चषकाच्या धामधूमीत टीम इंडियाच्या ‘राहुल’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Asia Cup: माजी क्रिकेटपटूने पाकिस्तान विरुद्ध निवडली भारताची प्लेइंग इलेवन, पंत आणि कार्तिकपैकी…






