पुणे, २२ डिसेंबर – क्रीडा प्रबोधिनी संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवण्याच्या संधीकडे वाटचाल केली. पुरुष गटात त्यांची जीएसटी कस्टम संघाशी लढत होणार असून महिला गटात त्यांच्यापुढे पीसीएमसी अकादमीचे आव्हान आहे.
ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केली आहे.
पहिल्या उपांत्य फेरीत जीएसटी कस्टम्स पुणे संघाने पीसीएमसी अकादमीचा ४-२ असा पराभव केला. गोल करून करण्याच्या कौशल्यामध्ये उत्कृष्ट सांघिक खेळ करीत जीएसटी संघाने हा सामना जिंकला. स्टिफन स्वामी (७वे) याने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत संघाचे खाते उघडले. बी. फेलिक्स (३६वे) याने जीएसटी संघाकडून पूर्वार्धात गोल केला. पीसीएमसी अकादमीसाठी भरत भारद्वाज (३०वे) आणि हर्षदीप सिंग (३२वे) यांनी पेनल्टी-स्ट्रोकचे गोलात यशस्वी रूपांतर करून २-२ अशी बरोबरी साधली.
तथापि, जीएसटी संघाच्या प्रणव माने (४५वे) याने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत संघास पुन्हा आघाडी मिळवून दिली. नंतर तालेब शाह (५६वे) याने गोल करीत संघाची बाजू बळकट केली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनीने मध्य रेल्वे पुणे विरुद्ध ४-३ असा रोमहर्षक विजय मिळवला. धैर्यशील जाधव (१९वे, ४४वे) आणि सचिन कोळेकर (२१वे) पेनल्टी कॉर्नर आणि प्रज्वल मोहरकर (४६वे) यांनी गोल करीत क्रीडा प्रबोधिनीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.. मध्य रेल्वे पुणे संघांकडून ए.सद्दाम (३रे, १३वे) आणि विशाल पिल्ले (४९वे) गोल करीत उल्लेखनीय लढत दिली.
महिला विभागात क्रीडा प्रबोधिनीचा अंतिम सामना पीसीएमसी अकादमीशी होणार आहे.
उपांत्य फेरीतील एकतर्फी लढतीत क्रीडा प्रबोधिनीने मुंबई रिपब्लिकन्सचा ३-० असा पराभव केला. तनुश्री कडू (६वे) हिने स्कोअरिंगला सुरुवात केली, त्यानंतर दीक्षा पाटीलने (५१वे) आणि माही चौधरी (५३वे) यांनी गोल करीत संघास सहज विजय मिळवून दिला.
नंतर, पीसीएमसी अकादमीने यजमान एक्सलन्स हॉकी अकादमीवर ४-१ अशी मात केली. त्यावेळी त्यांच्याकडून प्राजक्ता माने (६वे), भावना खाडे (२८वे) हिने पेनल्टी कॉर्नरवर, शालानी साकुरे (५०वे) हिने पेनल्टी स्ट्रोकवर आणि सानिका माने (५४वे) हिने फील्ड गोल केला. नेहा खैराळे (३६वे) हिने पराभूत संघाकडून एक गोल केला.
निकाल
पुरुष: उपांत्य फेरी जीएसटी कस्टम्स पुणे: ४ (स्टिफन स्वामी ७वे; बी.फेलिक्स ३६वे; प्रणव माने ४५वे; तालेब शाह ५६वे) वि.वि पीसीएमसी अकादमी: २ (भारत भारद्वाज ३०वे; हर्षदीप सिंग ३२वे).
क्रीडा प्रबोधिनी: ४(धैर्यशील जाधव १९वे, ४४वे; सचिन कोळेकर २१वे; प्रज्वल मोहरकर ४६वे) वि.वि. मध्य रेल्वे पुणे: ३ (ए.सद्दाम ३रे, १३वे; विशाल पिल्ले ४९वे.).
महिला: क्रीडा प्रबोधिनी: ३ (तनुश्री कडू ३रे; दीक्षा पाटील ५१वे; माही चौधरी ५३वे ) वि.वि मुंबई रिपब्लिकन: 0.
पीसीएमसी अकादमी: ४ (प्राजक्ता माने ६वे; भावना खाडे २८वे ; शालानी साकुरे ५०वे ; सानिका माने ५४वे) वि.वि.एक्सलन्स हॉकी अकादमी: १ (नेहा खैराळे ३६वे).
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS Test । भारतासाठी चौघांची शानदार अर्धशतके, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या दिशेने
डीन एल्गरचा मोठा निर्णय, माजी कर्णधार भारताविरुद्ध खेळणार कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका