मुंबई । भारत पेट्रोलियमने अपेक्षेनुसार आमदार चषक कबड्डी स्पर्धा जिंकताना एका फारशा न रंगलेल्या लढतीमध्ये मध्य रेल्वेचा २८-२० असा चांगल्या फरकाने पराभव केला आणि रुपये दीड लाखाचा पुरस्कार हस्तगत केला.
प्रभादेवीचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि आमदार सदा सरवणकर यांनी आयोजित केलेल्या या दर्जेदार स्पर्धेला कबड्डीशौकीनांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
मात्र अंतिम लढतीत, खास करून पूर्वार्धात जो एक-दोन चकमकी सोडता सावध खेळ झाला. त्यामुळे प्रेक्षकांना मन:पूर्वक आनंद लुटता आला नाही हे निश्चित.
मध्यंतराला विजयी संघाकडे ११-१० अशी नाममात्र आघाडी होती. याआधी ज्या उपांत्य लढती झाल्या त्यात पेट्रोलियन संघाने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (पुणे) यांचा २५-२० असा पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात रेल्वेने राज्य पोलिसांवर ३५-३७ अशी मात केली. उपविजयी आणि उपांत्य पेâरीत पराभूत संघांना अनुक्रमे १ लाख आणि प्रत्येकी ५१ हजारांचा पुरस्कार प्राप्त झाला.
अंतिम फेरीची लढत म्हटले की दोन्ही संघांवर तणाव व तो सुरुवातीपासूनच जाणवत होता. श्रीकांत जाधवने रेल्वेकडून खाते खोलले पण त्याला विशाल मानेने बाद केले व पाठोपाठ पेट्रोलियमच्या काशीलिंगला गणेश बोडकेने ‘डॅश’ मारत बाहेर फेकले.
३-३ अशी स्थिती तेव्हा झाली. दोन्हीकडून १-१ गुण घेण्यापलिकडे फारसे काही नव्हते. साधारणपणे १३ मिनिटांत गुणफलक ६-६ असा बरोबरीत होता.
त्यानंतर श्रीकांतने निलेश शिंदे आणि गिरीश इरनाक यांच्या तावडीतून सुटका करून घेत रेल्वेला ९-६ अशी तीन गुणांची आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला पेट्रोलियमकडे ११-१० अशी १ गुणांची आघाडी होती.
उत्तरार्थातही रडाळ खेळडाची परंपरा कायम राहिली. श्रीकांत थंडावल्यानंतर रेल्वेच्या विनोद अत्याळकर याने चांगला खेळ करीत गुणांची कमाई केली. काशीलींगने रेल्वेवर लोण चढविण्याची संधी गमावली.
त्याची ‘सुपर टॅकल’ झाली. १७-१६ च्या पिछाडीनंतर पेट्रोलियमच्या आकाश पिकलमुंडेने गणेश बोडकेला बाद केले. तर इरनाकने श्रीकांतचे पकड केली. पेट्रोलियमने दोन गडी बाद करीत लोण चढवला आणि रेल्वेवर २२-१७ अशी आघाडी मिळविली.
लढतीच्या अखेरच्या काही मिनिटांत रेल्वेच्या श्रीकांतची तीनदा पकड झाली आणि पेट्रोलियमचा विजय निश्चित झाला. शेवटच्या चढाईवर आकाशाने २ बळी मिळवत पेट्रोलियमला २८-२० असे विजयी केले.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!
–मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल
–म्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले
–दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा सचिन