---Advertisement---

आंद्रे रसलचे एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!

---Advertisement---

अमेरिका क्रिकेट लीगमध्ये खेळेल्या जाणाऱ्या मेजर क्रिकेट 2024 च्या लीगमध्ये 15 जुलै रोजी 11 वा सामना खेळला गेला. हा सामना लाॅस एंजिल्स नाइट विरुद्ध वाॅशिंग्टन फ्रीडम यांच्यात खेळला गेला. वाॅशिंग्टन फ्रीडम संघाने या सामन्यात विजय मिळवले. वाॅशिंग्टन फ्रीडम संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ सोबत ट्रेव्हिस हेडची शानदार फलंदाजी पहायला मिळाली. सामन्यात दोन्ही खेळाडूंच्या आतषी चाैकार षटकारांचा आनंद चाहत्यांना घेता आले. याच दरम्यान या चौकार-षटकारांमध्ये एक अनोखी घटना पाहायला मिळाली. शॉट मारताना ट्रॅव्हिस हेडची बॅट तुटली.

लाॅस एंजिल्स नाइट रायडर्स विरुद्ध वाॅशिंग्टन फ्रीडम यांच्यातील सामन्यात आंद्रे रसलच्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे झाले. वास्तविक, दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेव्हा आंद्रे रसलने वेगवान उसळती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि त्याच्या बॅटचे दोन तुकडे उडाले. पहिला तुकडा हातात तर दुसरा तुकडा लेग स्कवेअर अंपारच्या बाजूला जाऊन पडला. या दरम्यान ट्रेव्हिस हेडची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. परंतु तो त्या चेंडूपासून स्वत: ला सावरत चेंडू मीड विकेटकडे ढकलले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Major League Cricket (@mlcricketusa)

या घटनेनंतरही ट्रेव्हिस हेडची बॅट शांत बसली नाही. हेडने 32 चेंडूत 67 धावांची खेळी खेळली ज्यमध्ये त्याने 168.75 च्या स्टाइक रेटने फलंदाजी करत 2 चाैकार आणि 6 षटकार ठोकल्या. सामन्यात त्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथ सोबत 79 धावांची महत्तवपूर्ण भागीदारी केली. परंतु हेड 9 व्या षटकात बाद झाला. पण तो पर्यंत हेडच्या आक्रमक फलंदाजीमुळे वाॅशिंग्टन फ्रीडम संघ मजबूत स्थितीत पोहचला होता.

महत्तवाच्या बातम्या-

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी ओपनिंग कोण करणार? हे 4 दावेदार रेसमध्ये
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---