---Advertisement---

क्रिकेट सामना की थ्रिलर सिनेमा? 1 चेंडू, 1 धाव! श्वास रोखणारा व्हिडिओ समोर!!!

---Advertisement---

मेजर लीग क्रिकेट MLC 2025 काल (26 जून) झालेल्या रोमांचक सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम संघाने लॉस एंजेलिस नाईट रायडर्सवर 5 गडी राखून थरारक विजय मिळवला. या सामन्यात वॉशिंग्टनने शेवटच्या चेंडूवर 214 धावांचे लक्ष्य पार केले. या थरारक सामन्याच्या शेवटच्या चेंडूचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 213/4 धावा केल्या. ज्यामध्ये अँड्र्यू फ्लेचरने 60 चेंडूत 104 धावांची तुफानी खेळी केली. त्याला उन्मुक्त चंद (41), रदरफोर्ड (20) आणि आंद्रे रसेल (30*) यांची चांगली साथ मिळाली. फ्लेचरने 7 चौकार आणि 6 षटकार मारले आणि 18व्या षटकात ‘रिटायर आउट’ झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना, वॉशिंग्टनच्या फलंदाजांनी सामूहिक प्रयत्नांतून विजय मिळवला. मिशेल ओवेन (16 चेंडूत 43), ग्लेन मॅक्सवेल (23 चेंडूत 42), अँड्रिज गौस (31), आणि ग्लेन फिलिप्स (33*) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. रचिन रवींद्र (18) आणि ओबस पिनार यांनीही उपयोगी कामगिरी केली.

सामन्याच्या शेवटच्या षटकात वॉशिंग्टनला 7 धावांची गरज होती. आंद्रे रसेलच्या शानदार तीन चेंडूंनी सामना रंगात आला, पण शेवटच्या चेंडूवर फिलिप्स आणि पिनार यांनी एक-एक धावा घेत सामना फ्रीडमच्या बाजूने फिरवला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा-

या विजयामुळे वॉशिंग्टन फ्रीडम संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर नाईट रायडर्स पाचव्या क्रमांकावरच राहिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---