---Advertisement---

मराठी समालोचनासाठी मनसेचा पुन्हा खळखट्याकचा इशारा!

On: सोमवार, जुलै 25, 2022 11:48 PM
MNS
---Advertisement---

राज ठाकरे अध्यक्ष असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे हा राजकीय पक्ष सातत्याने महाराष्ट्रात मराठी बोलण्यासाठी आग्रही असतो. मराठीसाठी पक्ष व त्यांचे कार्यकर्ते कडवटपणा दाखवताना दिसतात. अनेक क्रीडा स्पर्धांचे समालोचन मराठीतून व्हावे म्हणून, त्यांनी यापूर्वी यशस्वी आंदोलने केली आहेत. आता पुन्हा एकदा मनसेने दोन खेळांच्या व्यावसायिक लीगमध्ये मराठी समालोचनाचा समावेश करण्यात यावा म्हणून प्रसारण वाहिनीशी चर्चा सुरू केली आहे.

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यामध्ये आगामी प्रो कबड्डी व खो-खो लीगमध्ये मराठी समालोचनाचा समावेश करावा म्हणून, आपण संबंधित वाहिनीशी बोलणार असल्याचे म्हटले. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की,

‘महाराष्ट्रात स्पर्धा आणि तरीही मराठीतून समालोचन नाही! आयपीएल सामन्यांच्या वेळी मनसे पद्धतीने पाठपुरावा केला तेव्हा त्यांना झुकावं लागलं आणि मराठीतून समालोचन ऐकायला मिळालं. खो-खो आणि कबड्डी हे तर मराठी मातीतले खेळ आहेत मग तिथे मराठीतून समालोचन करायचं नाही अशी हिंमतच कशी होते? सोनी स्पोर्टसला मंगळवारी निवेदन स्वतः जाऊन देणार आहे. त्यानंतरही निर्णय बदलला नाही तर मग काय करणार, ते काय सांगायला हवं?’

मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने मागील दोन आयपीएलपासून सातत्याने मराठी समालोचन क्रिकेटचाहत्यांना ऐकायला मिळत आहे. पुढील काही महिन्यातच प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सुरू होणार आहे. तसेच, प्रथमच भारतीय मातीतील खेळ असलेल्या खो-खोची व्यावसायिक लीग सुरू होईल. या दोन्ही लीग सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवल्या जातील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…” 

यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे 

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कॅप्टन केनचे कमबॅक; असा आहे न्यूझीलंडचा संघ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---