टी२० क्रिकेट या झटपट क्रिकेट प्रकारामध्ये खेळाडूंची चांगलीच कसोटी लागते. यामध्ये फलंदाज लवकरात लवकर धावा काढण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या या क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी व्हायचे असेल, तर ३६० डिग्रीचा खेळाडू असणे आवश्यक आहे, असे मत एस बद्रीनाथने मांडले आहे. तसेच तो खेळाडू शारीरिकपणे तंदुरूस्त आणि मानसिकरीत्या सक्षमही असला पाहिजे, असेही त्याचे म्हणणे आहे.
मागील इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) हंगामाचे लिलाव पाहिले, तर अष्टपैलू खेळाडूंची रक्कम अधिक आहे. आर अश्विन, ग्लेन मॅक्सवेल, राशिद खान आणि राहुल तेवतिया हे खेळाडू त्यांच्या फलंदाजीने महाग विकले गेले होते.
“आधुनिक क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येक खेळाडूंनी ३६० डिग्री असणे गरजेचे आहे. त्यात तो खेळाडू शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त आणि त्याची मानसिक स्थितीही संतुलित असली पाहिजे,” असे बद्रीनाथने म्हटले आहे.
“फलंदाजाला त्याने मारलेल्या प्रत्येक शॉटवर सुधारणा करायची असते, तर गोलंदाजांनाही एखादे षटक खराब गेले तर त्यात काय चुका झाल्या हे पाहून त्या पुन्हा करायच्या नाही त्यावर जोर द्यायचा असतो”, असेही बद्रीनाथ पुढे म्हणाला.
चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू असलेला सुब्रमण्यम बद्रीनाथ याने चेन्नईकडून २००८-२०१३ असे सहा आयपीएलचे हंगाम खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९५ सामन्यांत १४४१ धावा केल्या आहेत. अनेक सामन्यांत त्याने महत्वाच्या खेळी केल्या आहेत.
तसेच बद्रीनाथने प्रथम श्रेणीत १०२४५ धावा केल्या आहेत. त्याला २००८मध्ये भारतीय वनडे संघात स्थान मिळाले होते. यावेळी त्याने पदार्पणातच चांगली खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली होती.
श्रीलंका विरुद्धच्या त्या सामन्यात दाम्बुलाच्या खेळपट्टीवर धावा करणे कठीण होते. यजमान संघच १४२ धावातच गारद झाला होता. नंतर बद्रीनाथने मुथय्या मुरलीधरन आणि अजंता मेंडिस यांना चांगले शॉट्स मारत एमएस धोनीसोबत नाबाद २७ धावांची सामना विजयी खेळी खेळली.
बद्रीनाथ भारतीय संघातून आत-बाहेर होत राहिला. नंतर त्याला विशेष संधी मिळाल्या नाही. तसेच चेन्नईचा माजी खेळाडू एन जगदीशनने पण आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे व्हायचे असेल, तर कठोर मेहनत घ्यावी लागते, असे म्हटले आहे. या २६ वर्षीय खेळाडूने चेन्नईसोबत मागील चार आयपीएल हंगाम खेळले आहेत, तर २०२२च्या आयपीएलचे दोन सामने खेळले आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका- भारत मालिकेसाठी दोन्ही संघ ‘या’ दिवशी होणार मैदानात दाखल; बीसीसीआयने दिली माहिती






