---Advertisement---

मोईन अलीच्या जबरदस्त चेंडूने स्टंप्सचा भुगा, स्वत: विराट कोहलीही अवाक्; पाहा भन्नाट व्हिडिओ

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 12:52 PM
---Advertisement---

पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाचे दु:ख पचवून शनिवारी (१३ फेब्रुवारी) भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर उतरला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना चालू असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पहिले सत्र संपायच्या आतच भारताला ३ मोठे धक्के बसले. त्यातही कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाला.

झाले असे की, ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानंतर पहिल्या ५ चेंडूवर इंग्लंडचा गोलंदाज जॅक लीचने त्याला एकही धाव काढू दिली नाही. पुढे डावातील २२ वे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू मोईन अली आला. त्याने आपल्या षटकातील दुसरा चेंडू इतका जबरदस्त टाकला की, तो विराटच्या बॅट आणि पायातील अंतर कापत सरळ यष्टीला जाऊन लागला.

हे पाहून, स्वत: विराटही अवाक् झाला. त्याला थोड्या वेळासाठी आपण खरोखरच बाद झालो आहोत का नाही?, हेच कळाले नाही. शेवटी पंचांनी विराट त्रिफळाचित झाल्याचे घोषित केल्याने तो हताश होऊन शून्य धावेवर पव्हेलियनला परतला.

विराटचा त्रिफळाचित होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काहींनी विराट शून्यावर बाद झाल्याने दु:ख व्यक्त केले आहे. तर काहींनी मोईन अलीच्या गोलंदाजीचे कौतुकही केले आहे.

https://twitter.com/cxn_amir/status/1360476087340331009?s=20

https://twitter.com/Naveedk07/status/1360472741493821440?s=20

कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच झाला फिरकीपटूला शुन्यावर बाद
विराट कोहली ८९ कसोटी सामन्यांत पहिल्यांदाच फिरकीपटूला शुन्यावर बाद झाला आहे. विराट १४९ कसोटी डावांत आतापर्यंत ११ वेळा शुन्यावर बाद झाला असून त्यात तो पहिल्यांदाच फिरकीपटूचा बळी ठरला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ वेळा विराट शुन्यावर बाद झाला असून तो यातही पहिल्यांदाच फिरकीपटूला शुन्यावर बाद झाला आहे. याच कारणामुळे मोईन अलीसाठी विराटची हीच विकेट ड्रीम विकेट ठरली आहे. विराट कोहलीला कसोटीत त्रिफळाचीत करणारा मोईल अली केवळ दुसरा ऑफ स्पिनर ठरला आहे. यापुर्वी विराटला ग्रॅमी स्वॉनने २०१२मध्ये त्रिफळाचीत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG 2nd Test Live: पुजारा मागोमाग कोहली स्वस्तात बाद, भारत २२ षटकानंतर ३ बाद ८६ धावांवर

मैदानावर पाऊल ठेवताच नवा विक्रम नावावर! शून्यावर बाद होऊनही विराट विक्रमवीर, वाचा

कोहलीला रडवलं! चेन्नईतील दुसर्‍या कसोटीत विराट शुन्यावर बाद; नावावर अनेक नकोसे विक्रम

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---