मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. शुक्रवारी (२० मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ५ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी, चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने दमदार अर्धशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे त्याने एकाच षटकात २६ धावा चोपल्या होत्या.
या सामन्यात (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण, चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या रुपात पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि मोईन अलीने अर्धशतकी भागीदारी करताना डाव सांभाळला. दरम्यान, मोईन अली (Moeen Ali) पॉवरप्लेच्या षटकांमध्ये खूप आक्रमक होताना दिसला. त्याने पॉवर प्लेच्या अखेरच्या म्हणजेच डावाच्या ६ व्या षटकात ट्रेंट बोल्टविरुद्ध (Trent Boult) २६ धावा काढल्या.
विशेष गोष्ट अशी की मोईन अलीने या षटकातील सर्व चेंडू सीमापार केले. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून षटकार खेचला. त्यानंतर त्याने सलग ५ चेंडूंवर ५ चौकार मारले आणि या षटकात २६ धावा वसूल केल्या. त्याच्या या २६ धावांमुळे त्याने १९ चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले (26 runs in an Over).
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
1⃣ Six & 5⃣ Fours In An Over! ⚡️ ⚡️
Relive how Mooen Ali went berserk against Trent Boult 🎥 🔽 #TATAIPL | #RRvCSK | @ChennaiIPL https://t.co/o8JhlfUbYX
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
या सामन्यात मोईन अलीने ५७ चेंडू खेळताना १३ चौकार आणि ३ षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. त्याला ओबेड मॅकॉयने रियान परागच्या हातून झेलबाद केले. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईला २० षटकात ६ बाद १५० धावा करता आल्या. त्याच्याव्यतिरिक्त कॉनवेने १६ आणि कर्णधार एमएस धोनीने २६ धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त चेन्नईकडून कोणीही दोन आकडी धावसंख्या पार करू शकले नाहीत. राजस्थानकडून युजवेंद्र चहल आणि ओबेड मॅकॉयने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Dial M for Mo! #RRvCSK #Yellove #WhistlePodu 💛🦁 pic.twitter.com/KJmP1kMFmc
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2022
त्यानंतर राजस्थानकडून यशस्वी जैयस्वालने अर्धशतक केले; त्याने ५९ धावांची खेळी केली. तसेच आर अश्विनने नाबाद ४० धावा फटकावल्या. त्यामुळे राजस्थानने १५१ धावांचे आव्हान १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वेध आशिया चषक अन् टी२० विश्वचषकाचे! भारतीय दिग्गजाने निवडली संभावित टीम इंडिया, ‘या’ खेळाडूंना संधी
शेन वॉर्न त्याला ‘गोव्याची तोफ’ म्हणायचा, वाचा त्या स्वप्निल अस्नोडकरची संघर्षगाथा