द ओव्हल: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आज इंग्लंडने २३९ धावांनी पाहुण्या आफ्रिकेवर विजय नोंदवला. याबरोबर मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली.
परंतु सर्वांच्या खास लक्षात राहिली ती या सामन्यात घेतलेली हॅट्रिक. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली याने डीन एल्गार, रबाडा आणि मोर्ने मॉर्केल यांची विकेट घेऊन हा इंग्लंडचा विजय साजरा केला. ७६व्या षटकाचे शेवटचे दोन चेंडू आणि ७८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने ही कामगिरी साधली.
#सामना हॅट्रिकने संपवायची ही क्रिकेटमधील केवळ तिसरी आणि १९०२ नंतरची पहिलीच वेळ होती.
# डीआरएसने हॅट्रिक आहे किंवा नाही हे घोषित होण्याची ही केवळ तिसरी वेळ होती.
# द ओव्हल वरील हा विक्रमी १००वा सामना होता. विशेष म्हणजे त्यातच ही हॅट्रिक साधली गेली.
# ३ डावखुऱ्या गोलंदाजांना हॅट्रिकमध्ये बाद करण्याची ही पहिलीच वेळ होती.
# जागतिक क्रिकेटमध्ये बंदीनंतर परत आल्यानंतर प्रथमच आफ्रिकेविरुद्ध एखाद्या गोलंदाजाने कसोटीमध्ये हॅट्रिक घेतली आहे.
# १९१२ नंतर प्रथमच फिरकी गोलंदाजाने इंग्लंडमध्ये कसोटी हॅट्रिक घेतली आहे.
# कसोटी कारकिर्दीत शतक, हॅट्रिक आणि सामन्यात दहा बळी घेणारा मोईन अली केवळ ६वा गोलंदाज बनला आहे. भारताच्या इरफान पठाण आणि यांनीही ही कामगिरी केली आहे.
# ही कसोटी क्रिकेटमधील ४३वी हॅट्रिक होती तर इंग्लंडकडून १४वी हॅट्रिक होती.
# ही आफ्रिकेविरुद्ध ६वी तर १६ फिरकी गोलंदाजाने घेतलेली हॅट्रिक होती.
# ९वी हॅट्रिक ही ऑफ स्पिनरने तर द ओव्हलवरील पहिलीच हॅट्रिक होती.