भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी १ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळली जाणार आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह असल्याने टीम इंडियासमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. रोहित शर्मा या सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यास उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे भारत या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळेल अशी माहिती समोर आली आहे. मात्र, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मात्र विराट कोहलीला पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळताना पाहायचा आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला मालिकेत आघाडी घेता आली होती. मात्र, कोविड १९ मुळे मालिकेतील निर्णायक सामना एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. ही अपूर्ण राहिलेली मालिका यंदाच्या वर्षी पूर्ण करण्यात येत आहे.
या मालिकेविषयी बोलताना मोईन अली म्हणाला की, “हे खूप कठीण आहे. मात्र या मालिकेत विराट कोहली संघाचे नेतृत्व करत होता, त्यामुळे त्याला एका सामन्यासाठी संघाची कमान दिली जाऊ शकते. पण त्याला कर्णधार व्हायचे की नाही हा त्याचा निर्णय असेल. विराट आता कदाचित रिलॅक्स झाला आहे आणि त्याला पुन्हा कर्णधारपद स्वीकारायचे नाही. भारतासाठी ते अवघड आहे. विराटकडे अनुभव आहे आणि हा खूप महत्त्वाचा सामना आहे.”
विराटने कर्णधारपद सोडले होते
विराट कोहली आता कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाची कमान सांभाळत नाही. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले होते. त्याचवेळी बीसीसीआयने त्याला वनडेतून काढून रोहित शर्माकडे कर्णधारपद दिले. मात्र, या सामन्यापूर्वी रोहितला कोरोनाची लागम झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहला संघाची कमान मिळेल अशी चर्चा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीनंतरही भरले नाही संजूचे मन; म्हणाला, ‘माझ्याकडे संधी होती, पण…’
एवढी मोठी धावसंख्या केली, तरीही टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम; वाचा काय घडले
बाबर चा कहर! आता तर थेट विराटचाच विक्रम केलाय स्वत:च्या नावावर