भारतात होणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न जगातील सर्व क्रिकेटपटू पाहत असतात. मात्र, पाकिस्तानच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. असे असले तरी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर हा पुढच्या वर्षी आयपीएल खेळताना दिसू शकतो.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन सर्वांना चकित केले. आमिरने अद्याप कोणत्याही आयपीएल हंगामात भाग घेतला नाही. आमिरने मे महिन्यात ब्रिटिश नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. मोहम्मद आमिरची पत्नी आणि मूल आधीपासून युकेमध्ये आहे. आता त्याचा हा अर्ज स्वीकारला गेला असून, आगामी काउंटी हंगामात डर्बीशायर संघासाठी खेळताना दिसणार आहे. क्लब ने त्याला लोकल प्लेयर म्हणून आपल्या संघात जागा दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी तो इंग्लंडचा खेळाडू म्हणून आयपीएल लिलावात आपले नाव समाविष्ट करू शकतो.
मागील वर्षी आमिरने घेतली निवृत्ती
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. टीम मॅनेजमेंटकडून योग्य आदर मिळत नसल्याचा आरोप त्याने केला होता. आमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी, 61 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. आमीरने 2019 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळला नाही. सर्व गोष्टी योग्यरीत्या घडल्या तर मोहम्मद ब्रिटिश नागरिकत्वाद्वारे आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतो. यापूर्वी, अझर मेहमूदने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्यानंतर आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना दिसलेला.
(Mohammad Amir Declared Derbyshire Local Player For Next County Season Will Register Name For IPL Auction)
आणखी वाचा:
त्रिनिदादमध्ये सिराजचा कहर! पाच बळींनी यजमानांना 255 वर गुंडाळले, भारताकडे 183 धावांची आघाडी
सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे