पुढच्या महिन्यात पाकिस्तानचा संघ इंग्लड आणि आर्यलँडचा दौरा करणार आहे. यासाठी पाकिस्तानने संघनिवडही केली आहे.
पण या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात एकवेळ फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या मोहम्मद असीफची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केले.
तसेच त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीकडे दुर्लक्ष करून टी20 च्या खेळाडूंची इंग्लड आणि आर्यलँड विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड केली असल्याची टीका केली आहे.
याबद्दल तो म्हणाला इंग्लड आणि आर्यलँड विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आलल्या संघात पुरेसा अनुभव नाही. तरीही त्यांची महत्त्वाच्या इंग्लड आणि आर्यलँडच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
त्याचबरोबर तो म्हणाला की निवड समीतीने खेळाडूंची नजीकची कामगिरी लक्षात घेवून संघाची निवड करायला हवी. तसेच तो पुढे म्हणाला, दुर्दैवाने यावेळी काही खेळाडूंची निवड करताना असे झाले नाही.
असीफ आणि सलमान बट यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये वपडा संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच कैदे-ए-आझम ट्रोफीमध्ये सलग दोनदा वपडा संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
याआधी असीफ, सलमान बट आणि मोहम्मद अमीरवर 2010 साली इंग्लड विरूद्धच्या सामन्यात केलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली होती.
या बंदीनंतर अमीरने पाकिस्तान संघात जानेवारी 2016ला पुनरागमन केले आहे. पण अजुनही पाकिस्तान निवड समीतीने असीफ आणि बटचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी विचारकेलेला नाही.
असीफने पाकिस्तानकडून 23 कसोटी, 38 वनडे आणि 11 टी20 सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–1998 च्या आयसीसी क्रमवारीतील टॉप टेन खेळाडू पाहून थक्क व्हाल
–महाराष्ट्राची स्म्रिती मानधना आशिया कपसाठी भारताची उपकर्णधार तर मुंबईकर जेमिमाचाही संघात समावेश
–मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?
–दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळला नेहरा, आता होणार या राज्यात स्थायिक
–मुंबईकर पृथ्वी शाॅ ठरला ११ मोसमातील अनेक खेळाडूंना सरस