---Advertisement---

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसन खेळणार या संघासाठी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घोषणा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025 6:20 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतात रणजी ट्रॉफीचा (Ranji trophy) शुभारंभ होणार आहे, ज्यामध्ये देशातील अनेक संघ सहभागी होतील. अनेक राज्यांनी आगामी हंगामासाठी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 साठी केरळने आपला संघ जाहीर केला असून त्यात संजू सॅमसनलाही (Sanju Samson) स्थान मिळाले आहे. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी केरळकडून रणजी सामने खेळणार आहे.

आगामी रणजी हंगामासाठी केरळ क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीनची (Mohmmed Ajhruddin) निवड करण्यात आली आहे. त्याच्यासोबत संजू सॅमसनलाही संघात स्थान दिले गेले आहे. संजू 15 ऑक्टोबरपासून महाराष्ट्राविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भाग घेईल. अझरुद्दीनसाठी केरळ संघाचे नेतृत्व करणे मोठी संधी आहे, कारण या संघात वरिष्ठ खेळाडूंबरोबरच अनेक तरुण खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या (Rohit Sharma & Virat Kohli) निवृत्तीनंतर संजू सॅमसनला सतत टीम इंडियात संधी मिळत आहे. आशिया कप 2025 (Asia Cup) मध्येही त्याला संधी मिळाली होती. मात्र, तो मधल्या फळीत फलंदाजीला येत असल्यामुळे त्याला फलंदाजी करण्याची जास्त संधी मिळाली नाही. तरीही ओमानविरुद्ध त्याने 56 धावांची खेळी केली होती. तसेच श्रीलंकेविरुद्ध 39 आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 24 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत संजू चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.

रणजी ट्रॉफी 2025-26 साठी केरळचा संघ

मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार),बाबा अपराजित (उपकर्णधार), संजू सॅमसन, रोहन एस. कुन्नुमल, वाथसल गोविंद शर्मा, अक्षय चंद्रन, सचिन बेबी, सलमान निजार, अंकित शर्मा, निधीश एम.डी, बेसिल एन.पी, एडेन एप्पल टॉम, अहमद इमरान, शॉन रोजर, अभिषेक पी. नायर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---