भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. वनडे मालिकेत क्लीन स्वीप स्वीकारलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले. खेळाच्या तिन्ही विभागात भारतीय संघावर वर्चस्व गाजवत न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचा चांगलाच समाचार घेतला गेला. यादरम्यान त्याने नोबॉल देखील टाकला. आता त्याबाबत भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रांची टी20 मध्ये अर्शदीप संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज होता. या सामन्यात आपल्या पहिल्या तीन षटकांमध्ये त्याने अवघ्या 24 धावा देत कॉनवेचा महत्वपूर्ण बळी मिळवला होता. डावातील अठराव्या षटकात त्याने केवळ दोन धावा दिलेल्या. मात्र, डावातील अखेरचे षटक टाकताना डेरिल मिशेलने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने तीन षटकार व एक चौकार ठोकत या षटकात 27 धावा वसूल केल्या. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण 4 षटकात 51 धावा व 1 बळी असे झाले. पहिलाच चेंडू नो-बॉल टाकल्यानंतर मिचेलने त्याला हे तीन षटकार लगावले होते.
यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही तो वारंवार नो-बॉल टाकताना दिसला होता. त्याच्या या सातत्याने नो-बॉल टाकण्याविषयी बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर व मोहम्मद कैफ म्हटले,
“अर्शदीप वारंवार नो-बॉल टाकतोय ही गंभीर बाब आहे. याच्या मागील कारण, त्याचा मोठा रन-अप वाटतो. त्याने व संघाच्या प्रशिक्षकांनी लवकरात लवकर त्याच्या या कमतरतेविषयी काम करायला हवे.” आपल्या छोट्याशा कारकीर्दीत तो टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक नो-बॉल टाकणारा गोलंदाज ठरला.
(Mohammad Kaif And Sanjay Bangar Talks About Arshdeep Singh No Ball Problem)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मजबूत राहा, तुझा अभिमान आहे’, अखेरच्या ग्रँड स्लॅममध्ये हारताच सानियासाठी शोएबची भावूक पोस्ट
पत्नीसोबत नाचतानाही अक्षरने सोडले नाही क्रिकेट, डान्स फ्लोअरवर लावला षटकार अन् पकडला कॅच; व्हिडिओ पाहाच