---Advertisement---

१ रुपयांत ३० वर्षांपासून इडली विकणाऱ्या ८५ वर्षीय महिलेचा भारतीय क्रिकेटपटूकडून सन्मान

---Advertisement---

चेन्नई | भारतात सध्या कोरोना व्हायरसने बाधीतांची संख्या काही वृत्तांनुसार ६७ हजारांच्या पुढे पोहचली आहे. तर २ हजारच्या पुढे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.  गेल्या २४ तासांत ९७ पेक्षा अधिक नागरिकांनी भारतात प्राण गमवाले आहे.

काही प्रवासी नागरिकांना तसेच अन्य लोकांना कोरोनाच्या या स्थितीत अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागत आहे. तर काही असेही लोक आहेत जे नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी काळजी घेत आहेत.

अशीच एक महिला तामिळनाडू राज्यात काम करत आहे. तिचे नाव कमलथल. त्यांचे सध्या वय ८५ वर्ष आहे.

गेले ३० वर्ष ही महिला केवळ १ रुपयांत इडली विकत आहे. लाॅकडाऊनमध्ये धोका पत्करुन त्या गरजूंना मदत करत आहेत.

त्यांनी जे कामगार प्रवास करत आहे किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना जेवण देण्याचे काम अविरत सुरु ठेवले.

भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफनेही कमलथल यांचे कौतुक केले आहे. कैफने ट्विटरच्या माध्यमातू त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

“कमलथल या तामिळनाडूमधील ८५ वर्षीय महिला गेली ३० वर्ष केवळ १ रुपयात इडली विकत आहेत. ती आजही लाॅकडाऊनमध्ये फसलेल्या कामगारांना मदत मिळावी म्हणून नुकसान सहन करुन त्यांना जेवण देत आहे. त्यांची निस्वार्थी सेवा एक प्रेरणा देते,” असे कैफ आपल्या ट्विट मध्ये म्हणतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---