वर्ल्डकप काउंटडाऊनच्या आपल्या खास मालिकेत चौथ्या अंकाचा मानकरी ठरला आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ. भारताच्या सर्वकालीन महान क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या कैफ याने 2003 विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत श्रीलंकेविरुद्ध एक अचाट कामगिरी केली होती. काय होती ती कामगिरी हे आपण जाणून घेऊया.
या विश्वचषकातील सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका समोरासमोर आलेले. भारतीय संघाने सचिन आणि सेहवाग या सलामीवीरांच्या तुफानी खेळाच्या जोरावर 292 अशी मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना श्रीलंका संघ 109 धावांवर सर्वबाद झाला.
त्यावेळी मोहम्मद कैफ क्षेत्ररक्षणात चांगला चमकला. श्रीलंकेचा सलामीवीर मर्वान अटापट्टू, सनथ जयसूर्या, प्रभात निसंका व मुथय्या मुरलीधरन या चौघांचे झेल टिपले. विशेष म्हणजे हा विश्वचषक इतिहासातील एका डावात यष्टीरक्षका व्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्ररक्षकाने टिपलेले सर्वाधिक झेल आहेत. आगामी विश्वचषकात हा विक्रम कोण मोडतो का याकडे सर्वांचे लक्ष असेल.
(Mohammad Kaif Took 4 Catches In ODI World Cup Which Is Most By Any Fielder)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री