भारतीय क्रिकेट संघाचा माजी सदस्य आणि दिग्गज यष्टीरक्षक मोहम्मद कैफवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रोज टीका होते. परंतु आता एका नव्याच कारणामुळे कैफवर टीका होत आहे.
या माजी खेळाडुने २७जुलै रोजीमुलाबरोबर चेस खेळतानाचा एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने पुढे शतरंज के खिलाडी असेही म्हटले आहे. शिवाय पुढे #फादरसन, #कबिरटेल्स, #इन्स्टाप्ले असे हॅशटॅग वापरले आहेत.
यावर कैफला मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरे जावे लागले आहे. चेस खेळणं इस्लाम धर्माच्या विरोधातील असल्याच्या मोठ्या कंमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. तसेच चेस खेळणं हे हराम असल्याचं लक्षण सुद्धा म्हटलं आहे.
यावर एका माध्यमाने बातमी करून जेव्हा ती कैफला टॅग केली तेव्हा कैफने त्यांना रिप्लायमध्ये म्हटले आहे की त्या लोकांना विचार श्वास घेणेसुद्धा हरामाचे आहे का?