गुरुवारी (२७ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा २० वा सामना पार पडला. इंग्लंडकडून जेसन रॉयने झंझावाती अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडने ८ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला आहे. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात गचाळ प्रदर्शन केले आहे. परंतु मोहम्मद नईम याने त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या सामन्यात बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर १२४ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीर जेसनने ३८ चेंडूंमध्ये १६० च्या स्ट्राईक रेटने ६१ धावांची ताबडतोब खेळी केली. ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा फटकावल्या.
त्याच्या या तूफानी खेळीदरम्यान डावातील सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने लॉन्ग ऑनच्या दिशेने षटकार ठोकण्यासाठी शॉट मारला. यावेळी लॉन्ग ऑनच्या बाजूला सीमारेषेवर नईम क्षेत्ररक्षण करत होता. त्याने हा षटकार अडवण्यासाठी हवेत मोठी झेप मारली आणि चेंडू टिपण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चेंडू खूपच वरुन आल्यामुळे तो चेंडू त्याच्या हाताला स्पर्श करुन गेला आणि नईम चेंडूसंगे सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला.
परंतु त्याने तो षटकार अडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांकडून कौतुक होते आहे. अगदी आयसीसीनेही त्याच्या या चेंडू अडवण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर अकेला आहे. जर नईमने हा झेल पकडला असता तर तो यंदाच्या टी२० विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता. परंतु नईमला त्यात अपयश आल्याने रॉयला जीवनदान तर मिळालेच सोबतच ६ धावाही मिळाल्या.
https://www.instagram.com/reel/CViFF37FdI8/?utm_source=ig_web_button_share_sheet
लगेचच त्यापुढील चेंडूवर त्याने चौकारही मारला. पुढे त्याने आपले अर्धशतक पूर्ण इंग्लंडकडून एकाकी झुंज दिली. त्याच्याव्यतिरिक्त विस्फोटक फलंदाज डेविड मलानने नाबाद २८ धावा करत १५ व्या षटकातच हा सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडू सराव सत्रातही क्रिकेट किटसोबत का घेऊन जातात राष्ट्रध्वज? कारण आहे अभिमानास्पद
बडे दिलवाला आझम..! न्यूझीलंडला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना स्वत: केली शांत राहण्याची विनंती, होतंय कौतुक
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा ‘या’ पदावरुन राजीनामा, आयपीएलच्या २ नव्या संघांशी जोडलेले आहे प्रकरण