रविवारी (७ नोव्हेंबर) पाकिस्तान आणि स्कॉटलॅंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यात पाकिस्तान संघातील गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. ज्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघाला ७२ धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या सामन्यात पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान याला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या १५ धावा करत माघारी परतला. तरीदेखील त्याने एक मोठा विक्रम करत ख्रिस गेलसारख्या फलंदाजाला मागे टाकले आहे.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानने १९ चेंडूंमध्ये १५ धावांची खेळी केली होती. या खेळीसह त्याने ख्रिस गेलचा सहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षात १६६६ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक ख्रिस गेल याने २०१५ मध्ये १६६५ धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाला जर उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले, तर मोहम्मद रिजवानकडे आणखी २ सामने असतील ज्यामध्ये तो १७०० धावांचा पल्ला गाठू शकतो. असा कारनामा करणारा तो एकमेव फलंदाज ठरू शकतो.
तसेच मोहम्मद रिजवानकडे एकाच वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. त्याने येणाऱ्या सामन्यात जर ४४ धावा आणखी केल्या, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात १ हजार धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. असा कारनामा करणारा तो एकमेव फलंदाज असेल.
Most T20 runs in a calendar year:
Mohammad Rizwan – 1666* (2021)
Chris Gayle – 1665 (2015)
Virat Kohli – 1614 (2016)
Babar Azam – 1607 (2019)
AB de Villiers – 1580 (2019)https://t.co/69zy8EHZ4n | #PAKvSCO | #T20WorldCup pic.twitter.com/CAfDGi5VlA— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 7, 2021
एकाच वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१६६६* धावा – मोहम्मद रिजवान, २०२१
१६६५ धावा – ख्रिस गेल, २०१५
१६१४ धावा- विराट कोहली, २०१६
१६०७ धावा – बाबर आजम, २०१९
१५८० धावा – एबी डिविलियर्स, २०१९
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतावर ओढावली ही नामुष्की, उपांत्य फेरीपर्यंतही मारता आली नाही मजल
पत्नी सानियाने केले चीयर, मग काय शोएबने पाकिस्तानसाठी ठोकले सर्वात वेगवान टी२० अर्धशतक- VIDEO
कोहली, शास्त्री अन् आयसीसी ट्रॉफी, एक न सुटणारं गणित; सलग तिसऱ्या टूर्नामेंटमध्ये झालीय निराशा