---Advertisement---

“स्वत:ला राजा समजलो…” कर्णधार झाल्यानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य!

On: रविवार, ऑक्टोबर 27, 2024 9:17 PM
Mohammad Nawaz & Mohammad Rizwan
---Advertisement---

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोहम्मद रिझवानला (Mohammed Rizwan) पाकिस्तानचा एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. आता कर्णधार झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) म्हणाला की, “संपूर्ण पाकिस्तान संघ एक गट आहे, आमच्या संघातील सर्व 15 खेळाडू एकाच उद्देशाने काम करतील. जर मी कर्णधार म्हणून स्वत:ला राजा समजलो, तर सर्व काही कोलमडून पडेल, पण एक कर्णधार म्हणून मी संघातील 15 खेळाडूंची सेवा करण्यासाठी आलो आहे. आमच्यात जोश आहे आणि आम्ही लढत राहू. आम्ही निकाल अल्लाहवर सोपवला आहे. निकाल काहीही लागला तरी आम्हाला तो मान्य आहे, पण लढाऊ भावनेच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासणार नाही, हीच आमची हमी आहे.”

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (Pakistan And Zimbabwe) संघात आगामी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने असाणार आहेत. एकदिवसीय मालिकेत मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) पाकिस्तानचा कर्णधार असेल. पाकिस्तान विरूद्ध झिम्बाब्वे (Pakistan Vs Zimbabwe) संघातील एकदिवसीय मालिका 24 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

रिझवानच्या टी20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी 74 एकदिवसीय आणि 102 टी20 सामने खेळले आहेत. 74 एकदिवसीय सामन्यात रिझवानने 40.15च्या सरासरीने 2,088 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 13 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत. 102 टी20 सामन्यात रिझवानने 48.72च्या सरासरीने 3,313 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 126.45 राहिला आहे. टी20 मध्ये त्याने 29 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हे फक्त सचिनच करू शकतो! त्या खास खेळाडूंसाठी केलं असं काही की होतंय कौतुक
राधा यादवने मागे धावताना हवेत उडी मारत पकडला झेल, जबरदस्त फिल्डिंग पाहून सगळेच थक्क!
मोहम्मद शमीला मिळू शकते बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळण्याची संधी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---