मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवानं केली आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 184 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. मात्र सलामीवीर मोहम्मद रिझवान 20व्या षटकापर्यंत क्रिजवर असूनही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यानं 62 चेंडूत 73 धावा केल्या. यासह या यष्टीरक्षक फलंदाजाच्या नावे एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदल्या गेला आहे.
वास्तविक, मोहम्मद रिझवान आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दोन वेळा 50 किंवा त्याहून अधिक चेंडूचा सामना करून अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या 32 वर्षीय फलंदाजानं 2024 टी20 विश्वचषकात कॅनडा विरुद्ध 52 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. मात्र त्या सामन्यात पाकिस्तानला 7 गडी राखून विजय मिळाला होता. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य राष्ट्राच्या खेळाडूद्वारे सर्वाधिक चेंडूत अर्धशतकाचा रेकॉर्ड भारताच्या केएल राहुलच्याा नावे आहे. राहुलनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 56 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.
मोहम्मद रिझवानच्या या खेळीनंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. पाकिस्तानी चाहते त्याला लक्ष्य करून संघाच्या पराभवासाठी जबाबदार धरत आहेत. रिझवानला क्वेना मफाफानं 20व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद केलं. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. मात्र मफाफानं केवळ 7 धावा दिल्या. अशाप्रकारे पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव झाला.
याच सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम देखील फ्लॉप ठरला. तो 4 चेंडूत भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात स्लो अर्धशतक (पूर्ण सदस्य राष्ट्र खेळाडू)
केएल राहुल विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 56 चेंडू
गौतम गंभीर विरुद्ध ऑस्ट्रेलिया -54 चेंडू
शोएब खान विरुद्ध झिम्बाब्वे – 53 चेंडू
मोहम्मद रिझवान विरुद्ध कॅनडा – 52 चेंडू
ॲन्जेलो मॅथ्यूज विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 50 चेंडू
मार्टिन गुप्टिल विरुद्ध पाकिस्तान – 50 चेंडू
ड्वेन ब्राव्हो विरुद्ध इंग्लंड – 50 चेंडू
डेव्हिड मिलर विरुद्ध नेदरलँड्स – 50 चेंडू
मोहम्मद रिझवान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 50 चेंडू
हेही वाचा –
मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!
‘किलर मिलर’ला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी, या बाबतीत नंबर-1 खेळाडू बनणार
ICC Women ODI Rankings; दक्षिण आफ्रिकेची ही खेळाडू अव्वलस्थानी, टाॅप 10 मध्ये एकच भारतीय