आशिया चषक 2022 चा हंगाम शेवटाकडे चालला आहे. शुक्रवारी (09 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या संघात शेवटचा सुपर-4 सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवत 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने अशी काही प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि आझममध्ये मैदानावर असे काही झाले, ज्यानंतर आझमला आठवण करून द्यावी लागली की, तो कर्णधार आहे.
ही मजेशीर घटना श्रीलंकेच्या डावातील (SLvsPAK) 16 व्या षटकादरम्यान घडली. पाकिस्तानकडून हसन अली गोलंदाजी करत होता. स्ट्राईकवर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) होता. या षटकातील दुसऱ्याच शॉर्ट पिच चेंडूवर शनाकाने अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यात अपयशी ठरला. मात्र यष्टीमागे उभा असलेल्या रिझवानला (Mohammad Rizwan) वाटले की, चेंडू शनाकाच्या बॅटच्या कडेला लागून त्याच्या ग्लोव्ह्जमध्ये आला आहे.
यानंतर रिझवानने आत्मविश्वासाने पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी शनाकाला नाबाद करार केले. त्यानंतर रिझवानने कर्णधार आझमचा सल्ला न घेताच रिव्ह्यू घेतला. यालर पंच अनिल चौधरी यांनीही त्याची अपील मान्य केली. रिझवानने स्वत:च निर्णय घेतल्याचे पाहून आझम (Babar Azam) चिडला. तो रिझवानकडे येत त्याला म्हणून लागला की, ‘मी कर्णधार आहे’. यावर रिझवान हसताना दिसला.
पुढे आझमने रिझवानच्या रिव्ह्यूच्या निर्णयाला होकार दिला. क्रिकेटच्या नियमांनुसार, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाचा रिव्ह्यू तेव्हाच मान्य होतो, जेव्हा कर्णधार स्वत: त्यासाठी मागणी करतो. परंतु श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पंचांनी पाकिस्तानी सलामीवीर रिझवानचा रिव्ह्यू मान्य केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. श्रीलंकेचा कर्णधार शनाका नाबाद निघाला. त्याने 16 चेंडूत 21 धावा केल्या.
https://twitter.com/lazbasit/status/1568296162888945664?s=20&t=QNNpO6SuEbVTZYY4RyPWHw
Hilarious: Rizwan himself took a review of caught behind off Hassan Ali's bowling while Babar Azam came and said that I am the captain, all smiles. #PAKvsSL #PAKvSL #AsiaCup2022 pic.twitter.com/2zKHZg5Ecx
— Ahmad Haseeb (@iamAhmadhaseeb) September 9, 2022
Babar Azam reminding his team-mates that he is the captain after a review was taken without asking him #PAKvsSL #AsiaCup2022 pic.twitter.com/5ygqcsw29A
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) September 9, 2022
श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. अंतिम सामन्यापूर्वी उभय संघांत शेवटचा सुपर-4 सामना झाल्याने त्यांना एकप्रकारे सरावाची संधी मिळाली आहे. आता 11 सप्टेंबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात कोण विजयी होतो, हे पाहाणे रोमांचक ठरेल.
महत्वाच्या बातम्या-
जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान, वाचा मनीष पांडेचा क्रिकेट प्रवास
‘बारा गावचं पाणी’ पिणारा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळणार ग्रीनपार्कवर; सचिन अव्वलस्थानी
भारतीय वंशाचे इंग्लंडचे मातब्बर क्रिकेटर, ज्यांच्या नावे सुरू झाली ‘रणजी ट्रॉफी स्पर्धा’, वाचा त्यांच्याबद्दल