इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 विश्वचषकाची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत उद्या अफगाणिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. पण या सामन्याआधीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजाद या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याला गुडघ्याची दुखापत झाली आहे.
त्याला विश्वचषकापूर्वी झालेल्या पहिल्या सराव सामन्यातच गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यामुळे तो पाकिस्तान विरुद्ध झालेल्या या पहिल्या सराव सामन्यात रिटार्यड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. तसेच तो त्याच्यापुढील इंग्लंड विरुद्धचा सराव सामना खेळला नव्हता.
पण त्यानंतर त्याने विश्वचषकात अफगाणिस्तानचे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्धचे दोन्ही सामने खेळले. यात त्याला खास काही करता आले नाही. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध शून्य धावेवर तर श्रीलंका विरुद्ध 7 धावांवर बाद झाला. या दोन सामन्यांनतरही त्याला गुडघा दुखापतीचा त्रास होत असल्याने अखेर त्याला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले आहे.
त्याच्या ऐवजी अफगाणिस्तानच्या संघात 18 वर्षीय इक्रम अली खीलची निवड झाली आहे. खील हा मागील वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचा भाग होता. तसेच त्याने त्यानंतर अफगाणिस्तानच्या वरिष्ठ संघाकडून 2 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळला आहे.
त्याने आत्तापर्यंत खेळलेला आयर्लंड विरुद्धचा एकमेव कसोटी सामना हा अफगाणिस्तान संघासाठी ऐतिहासिक सामना होता. हा अफगाणिस्तानचा केवळ दुसरा कसोटी सामना होता. तसेच या सामन्यात विजय मिळवत अफगाणिस्तानने कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय संपादन केला होता.
या शिवाय खीलने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी, अ दर्जाचे सामने आणि टी20 असे मिळून 35 सामने खेळले आहेत. यात त्याने 4 अर्धशतकांसह 687 धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षण करताना 41 झेल आणि 12 यष्टीचीत केले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत मिशेल स्टार्कने रचला नवा विश्वविक्रम
–एमएस धोनीला ही गोष्ट पुन्हा करता येणार नाही, आयसीसीची बीसीसीआयला ताकिद
–विश्वचषक २०१९: शेल्डन कॉट्रेलने बाउंड्री लाईनवर स्टिव्ह स्मिथ घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ