इंग्लड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) अर्धशतक झळकावणाऱ्या मोहम्मद शमीने एक गगनचुंबी षटकार मारला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
या सामन्यातील पाचव्या दिवशी(१६ ऑगस्ट) इंग्लंड संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले होते. परंतु, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी मिळून भारतीय संघाला जोरदार पुनरागमन करून दिले होते. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला होता. या दोघांनी मिळून ९ व्या गडीसाठी नाबाद ८९ धावांची भागीदारी केली.
या डावात मोहम्मद शमीने ७० चेंडुंमध्ये नाबाद ५६ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने १०६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोईन अलीवर हल्लाबोल केला होता. त्याने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने चौकार लगावला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने स्टेपआऊट होऊन ९२ मीटर लांब गगनचुंबी षटकार लगावला होता. याच षटकारासह त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले.यानंतर लॉर्डसच्या ऐतिहासिक गॅलरीतून संघातील खेळाडूंनी आणि कर्णधार कोहलीने टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले होते.(Mohammad shami 92 metre six video went viral on social media)
A humongous six brings up the 50 for Shami, along with a huge round of applause at Lords! 🇮🇳
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Shami pic.twitter.com/etS5lmHKNr
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 16, 2021
भारतीय संघाने १५१ धावांनी मिळवला विजय
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी मिळून भारतीय संघाला २९८ धावांपर्यंत पोहचवले होते. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती.या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांना फार काळ टिकता आले नाही. दोघेही भोपळाही न फोडता माघारी परतले होते.
त्यानंतर पहिल्या डावात शतक झळकावणारा कर्णधार जो रूट याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो देखील या डावात मोठी खेळी करू शकला नाही. तो ३३ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. शेवटी जोस बटलरने एकहाती झुंज दिली. परंतु ही झुंज देखील अपयशी ठरली. तो २५ धावा करत तंबूत परतला होता. इंग्लंडचा संपूर्ण डाव १२० धावांवर संपुष्टात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
तालिबानी संकटानंतर अफगाणी क्रिकेटर उर्वरित आयपीएल खेळणार का? सनरायझर्स हैदराबादकडून आले उत्तर
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२१ पूर्वी यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना केलं मुक्त, ‘हे’ आहे मोठे कारण
भारीच! ऐतिहासिक विजयानंतर विराटसेनेला लॉर्ड्स ग्राउंडकडूनही मिळाल्या खास शुभेच्छा