---Advertisement---

Mohammad Shami । वेगवान गोलंदाजाच्या गाडीसमोर भीषण अपघात! घाटातील रस्त्यावर काय घडले पाहाच

On: रविवार, नोव्हेंबर 26, 2023 4:38 PM
Mohammed Shami
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने वनडे विश्वचषक गाजवला. पण भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मात मिळाली. 20 वर्षांनंतर विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची संधी भारताकडे आली होती, पण ती संघाला साधता आली नाही. मोहम्मद शमी सध्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नैनीताल याठिकाणी गेला आहे. जाताना शमीने प्रत्येक चाहत्याला अभिमान वाटावा असे एक काम केले आहे.

वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. मोहम्मद शमी विश्वचषक हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 7 सामन्यांमध्ये तब्बल 24 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव मिळाला होता. शमीने या महत्वाच्या सामन्यात देखील दोन विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या शमीसाठी हे जबरदस्त पुनरागमन ठरले. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. शमीला या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे.

मोकळ्या वेळेत शमी आपल्या मुत्रांसमोबत नैनीतालला गेला. जाताना वाटेत त्याच्या डोळ्यांदेखत एक कार अपघात झाला. शमीच्या समोरील गाडी अचाणक रस्त्याच्या खाली गेली. रस्ता घाटातील असल्यामुळे गाडीने रस्ता सोडल्यानंतर ती खाली जाऊन पडली. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शमीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “तो (अपघातग्रस्त गाडीचा चालक) नशिबवान होता. देवाने त्याला दुसरे आयुष्य दिले आहे. त्याची गाडी ठीक माझ्या गाडीसमोर होती, जी नैनीतालजवळ एका घाटातील रस्त्यात खाली पडली. आम्ही त्याला सुरक्षित बाहेर काढले आहे.”

दरम्यान, विश्वचषक संपल्यानंतर शमी अमरोह स्थित आपल्या घरी गेला होता. त्याठिकाणी स्थानिकांनी त्याचे जंगी स्वागत केले. पण विश्वचषक पराभवाची निराशा त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. सध्या तो या पराभवाच्या सदम्यातून बाहेर येत आहे. भारतीय संघ लवकरच तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. 10 डिसेंबर रोजी दौऱ्यातील पहिला, तर 3 ते 7 जानेवारी दरम्यान मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. शमी या दौऱ्यासाठी भारताचा महत्वाचा गोलंदाज असेल. (Mohammad Shami helped the driver of During accident)

महत्वाच्या बातम्या – 
माजी पाकिस्तानी गोलंदाजाची रोहित शर्माबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो जगातील सर्वात…
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण, भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केली भावनिक पोस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---