सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघ चांगल्या स्थितीत होता. ज्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने १५१ धावांनी जिंकला. यामुळे भारतीय संघाला या मालिकेत ०-१ ने आघाडी मिळाली.
मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्याला पूर्णपणे चुकीचा ठरवत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व राखले. पहिल्या डावात भारतीय संघ केवळ ७८ धावांवर गुंडाळला गेला. यामुळे भारतीय संघ या सामन्यात चांगलाच पिछाडीवर पडला.
दरम्यान, भारताच्या ७८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवात अत्यंत चांगली केली. मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी कमाल केली होती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज देखील इंग्लिश फलंदाजांना पुढे फिके पडले. असे असले तरीही, भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्या डावात इंग्लिश फलंदाज रोरी बर्न्सची विकेट घेत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
मोहम्मद शमीने सेना (SENA) म्हणजे दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांमध्ये १०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. यासह शमी सेना देशांमध्ये १०० विकेट्स घेणारा ५ वा भारतीय गोलंदाज ठरला. शमीने २९ कसोटी सामन्यांमध्ये या विक्रमाला गवसणी घातली आहे. यामध्ये ३४ च्या सरासरीने शमीने सेना देशांमध्ये १०० विकेट्स घेतल्या आहे. ज्यात त्याने ३ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तर ५६ धावा देऊन ६ विकेट्स ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. कुंबळेने ३५ कसोटी सामन्यांमध्ये ३७ च्या सरासरीने एकूण १४१ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये ५ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदा १० विकेट्स घेण्याचा देखील कारणामा कुंबळेने केला आहे. यानंतर ईशांत शर्माने १३० विकेट घेतल्या आहेत. तर जहीर खानने ११९ विकेट्स, त्याचबरोबर ११७ विकेट्ससह कपिल देव देखील या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
जसप्रीत बुमराह देखील लवकरच या विक्रमाला घालू शकतो गवसणी
मोहम्मद शमीनंतर भारताचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील लवकरच सेना देशांमध्ये १०० विकेट्सचा आकडा पार करू शकतो. बुमराह सेना देशांमध्ये आतापर्यंत १९ कसोटी सामन्यांमध्ये ७८ विकेट्स घेतलेल्या आहेत. सेना देशांमध्ये शंभरचा आकडा पार करण्यासाठी बुमराहला ४ वेळा ५ विकेट घ्यावे लागतील. इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत बुमराहने १२ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच या विक्रमाला गवसणी घालू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
–ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: खणखणीत चौकारासह जो रूटची शतकाला गवसणी, इंग्लंडच्या ३ बाद ३३३ धावा, २५५ धावांची आघाडीही घेतली
–संधीचं सोनं! तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करत मलानचे झुंजार अर्धशतक, त्याचा आनंद तर पाहा
–दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड