इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62 वा सामना सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने 34 धावांनी शानदार विजय मिळवत प्ले ऑफमधील आपली जागा पक्की केली. गुजरातसाठी 189 धावांचा बचाव करताना मोहम्मद शमी याने शानदार गोलंदाजी केली. यासोबतच तो पुन्हा एकदा पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नव्हती. शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी करूनही संघ केवळ 9 बाद 188 अशीच मजल मारू शकला. यामध्ये गिलने शतकी योगदान दिले. या आव्हानाचा बचाव करण्याची मोठी जबाबदारी गोलंदाजांवर होती.
गुजरातचा सर्वात अनुभवी गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमी याने चौथ्याच चेंडूवर अनमोलप्रीत सिंग याला तंबूचा रस्ता दाखवत अपेक्षित सुरुवात करून दिली. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकात आल्यानंतर त्याने राहुल त्रिपाठी व तिसऱ्या षटकात ऐडन मार्करम यांना बाद केले. आपल्या अखेरच्या षटकात गोलंदाजीला आल्यावर त्याने अर्धशतक खेळून झुंज देत असलेल्या क्लासेनला बाद करत हैदराबादच्या सर्व अपेक्षा संपवल्या. त्याने आपल्या 4 षटकात 20 धावा देऊन चार फलंदाज बाद केले.
हंगामात दुसऱ्यांदा चार बळी मिळवताना शमीने पर्पल कॅप आपल्या डोक्यावर सजवली. सध्या शमी व त्याचाच संघ सहकारी राशिद खान यांचे प्रत्येकी 23 बळी आहेत. मात्र, सरस सरासरी व इकॉनॉमी रेटमुळे शमी अव्वल स्थानी दिसून येतो. गुजरात संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरल्याने आता शमीकडे या हंगामात सर्वाधिक बळी मिळवून पर्पल कॅप आपल्याकडेच राखण्याची संधी असेल.
(Mohammad Shami Regain His Purple Cap After Performance Against Sunrisers Hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! चेन्नईचे 16.25 कोटी पाण्यात, IPL मध्येच सोडून ‘या’ दिवशी मायदेशी परतणार स्टोक्स; लगेच वाचा
गुजरातचं कंबरडं मोडत भुवीने रचला इतिहास! IPLमध्ये एकदा नाही, तर दुसऱ्यांदा केली जबरदस्त कामगिरी