भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा लवकरच मैदानात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी प्रमुख भूमिका बजावताना दिसू शकतो. तसेच या मोठ्या सामन्यापूर्वी त्याने भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
मोहम्मद शमीच्या मते विरोधी संघ आधी भारतीय संघाच्या फलंदाजांना कोंडीत पकडायचे; परंतु ते आता भारतीय संघाच्या गोलंदाजीलादेखील घाबरत आहेत.
त्याने क्रीकबजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला नेहमी असे वाटले आहे की, आमच्या संघातील फिरकी गोलंदाज असो वा जलद गोलंदाज. विरोधी संघ आमच्यापुढे गोंधळून जातो की आमच्या संघासाठी नेमकी कुठल्या प्रकारची खेळपट्टी तयार करावी. जर त्यांनी आम्हाला फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी उपलब्ध करून दिली. तर सर्वांनाच माहित आहे की, भारतीय संघ फिरकी गोलंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु जर त्यांनी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी उपलब्ध करून दिली, तर तिथेही त्यांची सुटका होणार नाही. आमच्या संघाने विरोधी संघाची डोकेदुखी वाढवली आहे.”
कुठलीही खेळपट्टी द्या भारतीय संघाला काही फरक पडणार नाही
तसेच तो पुढे म्हणाला की, “त्यांना आमची फलंदाजी माहीत असेल परंतु आमच्या गोलंदाजीमुळे नेहमीच त्यांना त्रास होत असतो. त्यांना लवकर कळून येतच नाही की भारतीय संघाच्या गोलंदाजांचा कसा सामना करावा. विरोधी संघाने फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी दिली, तर आमच्याकडे ३-४ उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. तसेच जर वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी असेल तरीदेखील आमच्याकडे ३-४ अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे कुटलीही खेळपट्टी असेल तरी आम्हाला फरक पडत नाही.”
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ १९ वर्षीय क्रिकेटपटू बनलाय राजस्थान रॉयल्सचा ‘धोनी’; कोहलीच्या सल्ल्याने दाखवलाय मार्ग
दुर्दैवचं अजून काय! अवघ्या ३ धावांनी हुकले फलंदाजाचे शतक, पाय क्रिजमध्ये असूनही झाला यष्टीचीत