भारतीय संघ सध्या आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या तयारीत आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल झाला आहे. चाहतेही या दोन बलाढ्य संघांना आमने सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण अशातच भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. कारण ठरत आहे एक व्हिडिओ जो सर्वत्र व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि उमरान मलिक (Umran Malik) भारतीय संघाचे महत्वाचे वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचे नेटकऱ्यांकडून म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडिओत सिराज आणि उमरान कपाळावर टिळा लावण्यास नकार देताना दिसत आहेत. या एकाच कारणास्तव सोशल मीडियावर हे दोन्ही वेगवान गोलंदाज मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहेत. नेटकरी सिराज आणि उमरानवर निशाणा साधत असले, तरी कपाळावर टिळा न लावून घेणाऱ्यांमध्ये भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील इतर काही सदस्यांचाही समावेश आहे.
नेमके प्रकरण काय?
त्याचे झाले असे की, भारतीय क्रिकेट संघ सामन्याआधी किंवा सामन्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. संघ त्यांच्या हॉटेलमध्ये प्रवेश करत अशताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे. कर्मचाऱ्यांकडून संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे स्वागत कपाळावर टिळा लावून केले जात आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह संघातील महत्वाच्या खेळाडूंनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडून लावण्यात आलेला टिळा आनंदाने स्वीकारला. पण सिराज आणि उमरानने मात्र कर्मचाऱ्यांना असे करण्यास नकार दिला. हिंदू संस्कृतीमध्ये कपाळावर टिळा लावून पाहुण्यांचे स्वागत करण्याची पद्धत आहे. पण सिराज आणि उमरान मुस्लीम असल्याने त्यांनी यासाठी नकार दिला, अशी टीका नेटकरी करत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओविषयी समिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
https://twitter.com/gritwik98/status/1621732807629504514?s=20&t=cewRr5o5yUzBP5iXP3ybhA
दरम्यान, भारतीय संघाचा हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असू शकतो. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उमरान मलिक संघात नाहीये. व्हिडिओ न्यूझींलड किंवा श्रींलंकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यानचा असू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार केला, तर मोहम्मद सिराजवर मोठी जबाबदारी असेल. कारण संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळत नाहीये. असात सिराज आणि त्याच्या साधीने मोहम्मद शमी यांना भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करावे लागेल. (Mohammad Siraj and Urman Malik’s refusal to apply a forehead mole has sparked a controversy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दादा धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी! सुपर किंग आणि प्रिंस ऑफ कोलकाताच्या भेटीचा फोटो व्हायरल
महाराष्ट्राच्या मुष्टीयोध्दांचे अचूक ठोसे, चार खेळाडू अंतिम फेरीत, दोन खेळाडूंना कांस्यपदक