वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (mohammad siraj) सध्या भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमाणाचा एक महत्वाचा भाग आहे. त्याने आयपीएलमधून स्वतःची ओळख निर्माण केली. २०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला पहिल्यांदा विकत घेतले होते, त्यानंतर पुढच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला संघात सामील केले. आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी सिराजने एक मोठा खुलासा केला आहे. पहिल्या हंगामासाठी त्याला मिळालेल्या पैशांमधून सिराजने स्वतःसाठी खास वस्तु खरेदी केली होती. आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिराजने सांगितले की, आयपीएलने त्याचे जीवन बदलले आहे. आयपीएलमुळे त्याचा आयुष्य जगण्याचा दर्जा सुधारला आहे. पहिल्यांदा जेव्हा सिराजला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, तेव्हा त्याने स्वतःसाठी सर्वात आधी आयफोन ७ प्लस खरेदी केला होता. तसेच कुटुंबासाठी त्याने एक सेकंड हॅंड गाडी खरेदी केली होती.
आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना तो म्हणाला की, “सर्वात आधी मी आयफोन ७ खरेदी केला. नंतर मी सेकंड हॅंड कार खरेदी केली, करोला. गाडी गरजेची आहे. आयपीएलमधील खेळाडूंकडे गाडी असणे गरजेचे आहे. अखेर कुठपर्यंत मी माझ्या प्लॅटिनावर फिरलो असतो? परंतु मला गाडी चालवता येत नव्हती. माझ्या काकाच्या मुलाला गाडी चालवता यायची. त्यामुळे जेव्हा कधी मला बाहेर जावे लागायचे, तेव्हा मी त्याला बोलवायचो.”
The RCB Podcast powered by Kotak Mahindra Bank: Trailer
10 episodes, plenty of interesting and never heard before stories about the tournament that made them the superstars they are!
(1/n)#PlayBold #WeAreChallengers #TheRCBPodcast pic.twitter.com/MWPQG3IEwH— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 1, 2022
सिराजने सांगिल्याप्रमाणे आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये गाड्यांविषयी खूप ओढा असतो आणि याच कारणास्तव त्यानेही गाडी खरेदी केली. सिराजच्या त्या गाडीत एसी नव्हता आणि प्रवास करताना त्याला अनेकदा काचा खाली घ्यावा लागायच्या. प्रावासादरम्यान अनेकदा चाहते त्याला ओळखायचे आणि आवाजही द्यायचे. परंतु परिस्थिती थोड्याच दिवसांमध्ये बदलली आहे. पुढच्याच वर्षी त्याने मर्सेडिज कंपनीची गाडी खरेदी केली.
दरम्यान आरसीबीने सिराजला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे. सिराजव्यतिरिक्त विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलला देखील आरसीबीने पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे. विराटने संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. आरसीबीने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाहीय. अशात पुढच्या हंगामात संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.
महत्वाच्या बातम्या –
पाहुणे आले! वनडे, टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल, अहमदाबादमध्ये थांबणार
आयपीएल लिलावात नाव येताच ‘या’ फलंदाजाने पाडला धावांचा पाऊस; फ्रॅंचाईजींचे वेधले लक्ष
४ मार्चला प्रदर्शित होणार ‘झुंड’; अमिताभ बच्चन साकारतायेत फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका