आयसीसीने नुकतेच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. मागील आठवड्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सामन्यांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिका खेळली गेली. सांघिक कामगिरीसह वैयक्तिक क्रमवारी देखील जाहीर करण्यात आली असून, गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानंतर त्याने आपली इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपल्या वडिलांची आठवण काढली.
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिराजने श्रीलंका संघाविरुद्ध 6 विकेट्स घेतल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिलेली. यामुळे 8 स्थानांच्या फायद्यासह तो थेट अव्वलस्थानी पोहोचला. कारकिर्दीत तो दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या कामगिरीनंतर त्याने आपल्या वडिलांची आठवण काढत एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली.
No.1 Ranked ODI bowler – Mohammed Siraj's Instagram story for his father. pic.twitter.com/5eq30iTkke
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 20, 2023
या फोटोमध्ये त्याचे वडील व आई त्याची पहिल्यांदा भारतीय संघात निवड झालेली असताना, त्याचे कौतुक करत आहेत असे दिसते. या फोटोला त्याने मिस यु पापा असा असे कॅप्शन दिले.
सन 2020-2021 या कालावधीत सिराजची प्रथमच भारताच्या कसोटी संघात निवड झाली होती. तो ही मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. मात्र, त्याने भारतात न येता संघासह ऑस्ट्रेलियात राहण्याचा निर्णय घेतला. तसेच भारताला ती मालिका जिंकून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. तेव्हापासून तो आपल्या वडिलांना स्मरण करून खास सेलिब्रेशन करत असतो. सध्या तो भारताच्या वनडे व कसोटी संघाचा प्रमुख सदस्य असून, आगामी वनडे विश्वचषकात त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
(Mohammad Siraj Post Instagram Story After Become Number 1 ODI Bowler)
हेही वाचाच-
सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर