सध्या भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पाचवा कसोटी सामना सुरू आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी दबदबा निर्माण केला आणि सुरुवातीला केवल ९८ धावांवर भारताचे ५ गडी बाद केले. त्यानंतर मात्र भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि इंग्लंडला एका पाठोपाठ एक झटके दिले आहेत. अशातचं भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडचा फलंदाज जो रुटला बाद करत सर्वात मोठा झटका दिला आहे.
India get the big fish 👊#WTC23 | #ENGvIND | 📝 Scorecard: https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/ArP8ARHImK
— ICC (@ICC) July 2, 2022
भारताने पहिल्या डावात ९८ धावांवर ५ गडी गमावल्यानंतर रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी शतकी खेळी करत भारताचा डाव ४१६ धावांवर नेण्यास मदत केली. त्यानंतर गोलंदाजी करण्यास आलेल्या भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना धूळ चारली. पहिले जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे तीन गडी बाद केले. त्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या हुकमी एक्क्याला बाद करत इंग्लंडला सर्वात मोठा झटका दिला आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या २३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंंडूवर जो रूटने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शॉट खेळत असताना चेंडू बॅटचा किनारा घेत थेट यष्टरक्षक रिषभ पंतकडे गेला. पंतने कोणतीही तूक न करता झेल टीपला, आणि जो रुटला बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND | रिषभ पंतचा ‘तो’ चौकार ज्यामुळे पडला जेम्स अँडरसनचा चेहरा
विराटची विकेट खरं म्हणजे आफ्रिदीनं घेतलीये, वाचा काय आहे कनेक्शन
रिषभ पंतच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त ट्वीट, पाहा चाहते का भडकले