आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर केएल राहुल याच्या हातून झेलबाद केले होते. त्यानंतर आता मोहम्मद सिराज याने आपल्या दुसऱ्या षटकात चार फलंदाजांना बाद करत श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यानंतर पुढच्या षटकातही एक गडी बाद करत केवळ 16 चेंडूवर 5 फलंदाज बाद केले.
या सामन्यात श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिसऱ्याच चेंडूवर बुमराहने कुसल परेराला बाद करून हा निर्णय चुकीचा ठरणार असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या षटकात एकही फलंदाज बाद झाला नाही. मात्र, चौथ्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या व अखेरच्या चेंडूवर त्याने फलंदाजांना बाद करत श्रीलंकेचा डाव पूर्णता कोलमडून ठेवला. त्यानंतर सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर देखील त्याने श्रीलंकेचा कर्णधार शनाका याला बाद केले. यासह सर्वात जलद पाच बळी मिळवणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या चामिंडा वास याने 16 चेंडूंमध्ये अशी कामगिरी केलेली. त्यानंतर पुन्हा एकदा सातव्या षटकात त्याने कुसल मेंडिसला बाद करत आपला सहावा बळी मिळवला.
(Mohammad Siraj Took 5 Wickets In Just 16 Balls In Asia Cup Final)
हेही वाचा-
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक
भारताला भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार, वनडे मालिकेसाठी संघ घोषित