---Advertisement---

‘पूर्ण श्रेय विराटला…’, नंबर एकचा वनडे गोलंदाज बनल्यानंतर सिराजचा जुना व्हिडिओ व्हायरल

On: गुरूवार, जानेवारी 26, 2023 12:40 PM
Rohit Sharma Virat Kohli Mohammad siraj
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताच्या वनडे क्रमवारीत सिराजला पहिला क्रमांक मिळाला. सिराजने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर त्याला क्रमवारीत पहिला क्रमांक मिळाला. सिराजने त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर ही उपलब्धी प्राप्त केली असली तरीही त्याच्या यशामध्ये विराट कोहली याचे योगदान महित्वाचे राहिले आहे. सिराजचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विराट कोहलीला श्रेय देत आहे.

आयसीसी क्रमवारीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड (Trent Boult) आणि ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवूड (Josh Hazelwood) यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. 2023 वर्ष सुरू झाल्यापासून खेळलेल्या पाच वनडे सामन्यांमध्ये त्याने 14 विकेट्स घेतल्या. सध्या ट्वीटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत  सिराज त्याला मिळालेल्या यशात विराट कोहली (Virat Kohli) याची भूमिका महत्वाची राहिल्याचे सांगत आहे. सिराज मागच्या काही वर्षामध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वात आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळला आहे. मागच्या वर्षी विराटने आरसीबीचे कर्णधारपद जरी सोडले असले, तरी देखील विराटचे सिराजच्या कारकिर्दीतील महत्व मात्र तितकेच महत्वाचे राहिले आहे.

याविषयी सिराज म्हणतो की, “माझ्या निराशाजनक खेळीनंतर भैया (विराट) मला म्हणाला की, आरसीबी संघ व्यवस्थापनाने तुला रिटेन केल्यावर मला बरे वाटले. खरं सांगायचं तर मी आज जो काही आहे, त्याचे पूर्ण श्रेय विराट भाईला जाते. विराट कोहली आणि आरसीबी मॅनेजमेंटने माझे समर्धन केले आणि मला संघात कायम ठेवले.”

https://twitter.com/katyxkohli17/status/1618164031776489472?s=20&t=h2l1DxR6E5UZZb7W4AFd-w

सिराजने भारतीय संघात आणि आरसीबीसोबत खेळताना विराटसोबत ड्रेसिंग रूम शेअर केले आहे. त्याची वनडे कारकिर्द जास्त मोठी नाहीये, पण या छोट्याशाच कारकिर्दीतील त्याने दिग्गजांना मागे टाकत क्रमंक एकचा वनडे गोलंदाज बनला. सिराजने आजपर्यंत 21 वनडे सामने खेळले आहेत आणि यात 38 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 4.61 आहे, जो खरोखर उत्कृष्ट म्हणता येईल. वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या सिराजकडे सध्या 729 रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 727 रेटिंग पॉइंट्ससह ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवुड आहे. (Mohammad Siraj’s old video is going viral after winning the first place in the ICC ODI rankings)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात भारतीय मुलींची सेमी-फायनलमध्ये धडक
सुपर किंग्सला मोठा झटका! मॅचविनर गोलंदाज अवैध गोलंदाजी शैलीमूळे निलंबित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---