---Advertisement---

‘त्याची’ गोलंदाजी अशी भेदक होती की, सचिनने झाकले होते चक्क डोळे

On: गुरूवार, मे 28, 2020 1:13 PM
---Advertisement---

मुंबई I मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सर्वकालिन श्रेष्ठ फलंदजापैकी एक आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. सचिनने त्यांच्या कारकिर्दीत शाँन पोलाँक, वसीम अक्रम, वकार यूनिस, शोएब अख्तर, ग्लेन मॅकग्रा यासारख्या एकापेक्षा एक खतरनाक गोलंदाजाचा सामना केला आहे. यासर्वांच्या गोलंदाजीवर सचिनची बॅट भारी पडायची. याचदरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याने मात्र सचिन तेंडूलकरबद्दल धक्कादायक विधान केले आहे.

भारतीय संघ २००६ साली पाकिस्तान दौऱ्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी कराची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत सचिन तेंडूलकर वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा बाऊंसरचा चेंडू खेळताना डोळे बंद करत होता. त्याचे चेंडू खेळताना सचिनाला जड जात असल्याची धक्कादायक माहिती आसिफ याने दिला आहे.

आसिफने त्या सामन्याची आठवण करुन देताना म्हणाला, जेव्हा सामन्याच्या सुरुवातीला इरफान पठाण याने पहिल्याच षटकात हॅट्ट्रीक घेऊन पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले, त्यानंतर यष्टीरक्षक कामरान अकमल याने शतक ठोकून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शतकाच्या जोरावर पाक संघाने २४० धावा केल्या.

या सामन्यात शोएब अख्तर अतिशय वेगात गोलंदाजी करत होता. सचिन फलंदाजी करत होता तेव्हा, क्षेत्ररक्षण करण्यासाठी मी ‘स्क्वायर लेग’ पंचाच्या जवळ थांबलो होतो. शोएबच्या तीन बांऊसर चेंडूवर सचिनने चक्क डोळे झाकले होते. आम्ही भारतीय संघाला २४० धावादेखील करु दिल्या नाही.

पाकिस्ताने पहिल्या डावात सर्वबाद २४५ तर दुसऱ्या डावात ७ बाद ५९९ धावांचा डोंगर रचत डाव घोषित केला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात २३८ तर दुसऱ्या डावात २६५ धावा काढून सर्वबाद झाला. पाकिस्ताने हा सामना ३४१ अश्या विक्रमी धावाने जिंकला. आसिफने भेदक गोलंदाजी करत सामन्यात ७ गडी बाद केले.

पाकिस्तानने ही मालिका १-० अश्या फरकाने जिंकली तरी पहिले दोन्ही सामने अनिर्णित झाले होते. इंग्लंडमध्ये २०१० साली कसोटी सामन्यात ‘स्पाँट फिक्सिंग’ प्रकरणात मोहम्मद आसिफ दोषी आढळला होता. त्यानंतर त्याला ७ वर्ष ‘बॅन’ लावण्यात आले होते. त्यानंतर त्याची पाकिस्तानच्या संघात ‘एन्ट्री’ झाली नाही. या घटनेमुळे आसिफची कारकिर्द संपुष्टात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---